शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:13 IST

वाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : २०१६ पूर्वी वितरित केलेले जुने ‘एटीएम’ ३१ डिसेंबरपासून बंद करून त्याऐवजी ग्राहकांना ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’ दिले जात आहेत. मात्र, १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही अद्याप (१६ जानेवारी) अनेकांना नव्या पद्धतीचे ‘एटीएम’ मिळालेले नाहीत. बँकींग क्षेत्रातील या गोंधळामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले असून छोट्या-मोठ्या रक्कमेच्या ‘विड्रॉल’साठीही त्यांना बँकेत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.सुरक्षेचा मुद्दा समोर करून एटीएम सेवा पुरविणाऱ्या सर्वच बँकांनी ‘ईएमव्ही चीप’ (यूरोपे मास्टरकार्ड व्हीसा) नसलेले सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबरअखेर ‘ब्लॉक’ केले आहेत. त्याऐवजी ‘ईएमव्ही चिप’ असलेले नवीन एटीएम कार्ड दिले जात आहेत. मात्र, मुंबई येथील एटीएम कार्ड विभागाकडून सदर कार्ड नागरिकांच्या पत्यावर पाठविण्यास प्रचंड विलंब लागत असून बहुतांश ग्राहकांना अद्याप हे कार्ड प्राप्त झालेले नाही. त्यामुळे संबंधित नागरिक बँकांमध्ये जावून चौकशी करित आहेत; परंतु नवीन एटीएम कार्ड मिळायला आणखी ७ ते ८ दिवस लागतील आणि ते घरच्या पत्यावरच पाठविले जाईल, असे सांगून बँकांकडून ग्राहकांची बोळवण केली जात आहे.

‘डिजिटल बँकींग’चा अधिक सुरक्षित पर्याय म्हणून ‘ईएमव्ही चीप बेस्ड् एटीएम’ फायदेशीर ठरणार आहे. मुंबई येथील कार्ड विभागाकडून सर्व ग्राहकांच्या पत्यावर सदर ‘एटीएम’ पाठविण्यात येत असल्याने त्यास विलंब लागत आहे. ग्राहकांनी संयम बाळगावा, अशी अपेक्षा आहे.- दत्तात्रय निनावकरव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमatmएटीएम