शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

मानोरा येथील पीक वाढ संजिवकाच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 3:16 PM

वाशिम : गत काही महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या मानोरा येथील एका पीक वाढ संजिवक गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला अखेर १७ मे रोजी यश आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पीक वाढ संवर्धकाचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंदचे आदेश दिले.

ठळक मुद्दे कोणतीही तपासणी व चाचणी न करता पीक वाढ संजिवकाचा गोरखधंदा सुरू असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. १७ मे रोजी गुप्तता बाळगत कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे व तालुका कृषी विभागाच्या पथकाने पीक वाढ संजिवकाच्या ठिकाणाचा शोध लावण्यात यश मिळविले. पीक वाढ संजिवकाचे ‘रिपॅकिंग’ करून साठा असल्याचे यावेळी निदर्शनात आले.

वाशिम : गत काही महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या मानोरा येथील एका पीक वाढ संजिवक गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला अखेर १७ मे रोजी यश आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पीक वाढ संवर्धकाचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्री बंदचे आदेश दिले.

काही पिकांचे उत्पादन फलधारणा योग्य न झाल्याने घटते, तर काही पिकांमध्ये फलधारणा प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने विरळणीची गरज भासते. पीक वाढ संजिवकांद्वारे या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवून, पिकांचे उत्पन्न व दर्जा वाढविता येत असल्याचे पटवून देऊन या संजिवकांची शेतकºयांना विक्री केली जाते. मानोरा येथे कृषी विभागाची परवानगी न घेता तसेच गुणवत्तेसंदर्भात कोणतीही तपासणी व चाचणी न करता पीक वाढ संजिवकाचा गोरखधंदा सुरू असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वी मानोरा येथे छापे मारण्यात आले. मात्र, या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला यश आले नव्हते. १७ मे रोजी गुप्तता बाळगत कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे व तालुका कृषी विभागाच्या पथकाने पीक वाढ संजिवकाच्या ठिकाणाचा शोध लावण्यात यश मिळविले. पीक वाढ संजिवकाचे ‘रिपॅकिंग’ करून साठा असल्याचे यावेळी निदर्शनात आले. संजिवकाचे नमुने घेऊन तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. हा गोरखधंदा करणाºया ‘त्या’ इसमाकडे एका कंपनीचे नोंदणीकृत प्रमाणपत्र आहे. मात्र, कृषी विभागाचा परवाना व अन्य प्रशासकीय सोपस्कार करण्यात  आले नसल्याचे दिसून आले. संजिवकाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत व पुढील आदेशापर्यंत संजिवक विक्री बंदचे आदेश देण्यात आले, अशी माहिती कृषी विकास अधिकारी बारापात्रे यांनी दिली. या कारवाईप्रसंगी तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान, पंचायत समितीचे कृषी अधिकारी गजेंद्र चितावार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा