शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:54 IST

आमदार राजेंद्र पाटणी यांनीही या रुग्णालयातील समस्येचा विचार करून आरोग्य विभागाकडे २० ते २५ वेळा पत्रव्यवहार केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त पदांचा अहवाल गेल्या अनेक महिन्यांपासून वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. दरम्यान, आमदार राजेंद्र पाटणी यांनीही या रुग्णालयातील समस्येचा विचार करून त्या दूर करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे २० ते २५ वेळा पत्रव्यवहारही केला आहे.मानोरा तालुक्यातील ग्रामीण रुग्णांना मोफत आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मानोरा शहरात ३५ खाटांचे ग्रामीण रूग्णालय थाटण्यात आले. यामुळे गोरगरीब जनतेला आरोग्य विषयक समस्याही उपलब्ध झाल्या. कालांतराने या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची संख्या बदली, सेवानिवृत्ती आदि कारणांमुळे घटू लागली. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला असुविधांचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक आमदार राजेंद्र पाटणी यांनी थेट शासनाच्या आरोग्य विभागाकडे केवळ मानोरा ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदांच्या समस्येसह औषधींचा तुटवडा आणि अद्ययावत यंत्रांचा अभाव दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे बºयाच समस्या दूरही झाल्या असून, गोरगरीब रुग्णांना आवश्यक औषधीही उपलब्ध होऊ लागल्या. तसेच, क्ष-किरण तपासणीसाठी तज्ज्ञ कर्मचाºयांचा तुटवडा भासत होता. ती समस्या सोडविण्यासाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञाच्या रिक्त पदाचा अतिरिक्त प्रभार कारंजा येथील कर्मचाºयाकडे सोपविण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्यामुळे क्ष-किरण तपासणीची समस्याही दूर झाली आहे. आता वातावरणातील बदलामुळे विविध आजारांनी तोंड वर काढल्यानंतर या रुग्णालयात रुग्णांची गर्दी उसळत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य यामुळे धोक्यात येऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी येथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराRajendra Patniराजेंद्र पाटणी