शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा नगर पंचायतमध्ये सत्तांतर; नगर विकास आघाडीची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 18:08 IST

वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली.

ठळक मुद्देबरखा अलताफ बेग तर  उपाध्यक्षपदी अमोल प्रकाश राऊत यांचा १० विरूद्ध सात मताने विजय झाला. मालेगाव येथे अध्यक्षपदी रेखा बळी तर उपाध्यक्षपदी संतोष जोशी यांची अविरोध निवड झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. मानोरा येथील भारिप-बमसं, हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाची सत्ता गेली असून, येथे नगर विकास आघाडीच्या बरखा अलताफ बेग तर  उपाध्यक्षपदी अमोल प्रकाश राऊत यांचा १० विरूद्ध सात मताने विजय झाला. मालेगाव येथे अध्यक्षपदी रेखा बळी तर उपाध्यक्षपदी संतोष जोशी यांची अविरोध निवड झाली.मालेगाव व मानोरा नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ८ आॅगस्ट रोजी संपुष्टात येणार असल्याने ७ आॅगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. मालेगाव येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यावेळी नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिला असे आरक्षीत असून, काँग्रेसला दूर ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे रेखा अरुण बळी, गजानन सारसकर, मीनाक्षी सावंत, शितल उमेश खुळे, शिवसेनेचे संतोष जोशी, मदन राऊत, कविता देवा राऊत, शिवसंग्रामचे रामदास बळी, सुषमा अमोल सोनोने, भाजपचे किशोर महाकाळ हे एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली. अध्यक्ष पदासाठी राकाँच्या रेखा बळी यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे संतोष जोशी यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड अविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. मानोरा नगर पंचायत येथे भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाची सत्ता होती. ७ आॅगस्ट रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वपक्षीय १० नगरसेवकांनी एकत्र येत नगर विकास आघाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांना मतदान करून भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे मित्रमंडळाला सत्तेबाहेर ठेवले. नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या बरखा बेग तर उपाध्यक्षपदी अमोल राऊत विजयी झाले.अडीच वर्षांपूर्वी मानोरा नगर पंचायत येथे भारिप-बमसं व हेमेंद्र ठाकरे गटाने सत्ता प्राप्त करुन शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले होते. ७ आॅगस्ट रोजी सर्वपक्षीय १० नगरसेवकांनी एकत्र येत सत्तांतर घडवून आणले.                    या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरीत भारिप-बमसंकडून मंजुषा महेश निशाने यांना ७ मते पडली तर नगर विकास आघाडीच्या बरखा बेग यांना १० मते पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांनी तर सहायक निवडणुक  अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अमोल माळकर यांनी कामकाज पाहिले. नगर विकास आघाडीच्या १० नगरसेवकांमध्ये भारिप-बमसंचे दोन सदस्य, काँग्रेसचे चार, शिवसेना दोन, भाजपा एक, राष्ट्रवादी काँग्रेस एक असे नगरसेवक आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराElectionनिवडणूक