शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 17:15 IST

बाजार समितीत प्रशासक नियुक्त होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २३ सप्टेंबर रोजी संपली; परंतु कोरोना संसर्ग पृष्ठभूमीवर सध्याच नव्याने निवडणूक घेणे अशक्य असल्याने या बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बाजार समितीत प्रशासक नियुक्त होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नव्याने निवडणूका घेणे कठीण आहे. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीला शासनाने स्थगिती दिली असून, संबंधित संस्थेवर प्रशासक नियुक्त केले जात आहेत. त्यात मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. आता राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदतही संपुष्टात येत असून, या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यात मानोरा बाजार समितीची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात आली होती. निवडणूक प्रक्रियेंतर्गत या बाजार समितीची निवडणूक २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन नवे संचालक मंडळ सत्तेत येणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे इतर बाजार समित्यांत प्रशासक नियुक्त होत असताना या पृष्ठभूमीवर मानोरा बाजार समितीत प्रशासकांची नियुक्ती होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, या बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याने आता मानोरा बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून, ही मुदत संपल्यानंतरच येथे नव्याने निवडणूक होते की प्रशासकांची नियुक्ती केली जाते, ते कळू शकणार आहे.  

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा