शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅपिड अ‍ॅन्टिजन’ चाचणीवर मांगवाडीवासियांचा आक्षेप; गावातच दिला ठिय्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 11:30 IST

रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टवर गावकºयांनी शंकाही उपस्थित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगीर : रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य विभागातर्फे रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टवर भर दिला जात आहे. दुसरीकडे प्रत्येकाची टेस्ट करू नका, रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टनंतर आणखी तपासणी करावी, सवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करा या प्रमुख मागणीसाठी गावकऱ्यांनी २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान ठिय्या दिला तसेच २३ जुलै रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व तहसिल प्रशासनाला निवेदनही दिले.गावकऱ्यांच्या निवेदनानुसार, मांगवाडी येथे १५ जुलै रोजी तीन व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गावातील १४ जणांना सवड येथील कोविड केअर सेंटरला क्वारंटीन करण्यात आले. सवड येथील कोविड केअर सेंटर येथे फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत असा आरोप करीत गावात बहुतांश नागरिकांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांना सवड येथील कोविड केअर सेंटरला आणले जात असल्याने घरी चिमुकले मुलेच राहत आहेत. रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टवर गावकºयांनी शंकाही उपस्थित केली आहे. घरातील कर्त्या पुरूषांना कोविड केअर सेंटरला नेण्यात येत असल्याने लहान मुलांचा, गुराढोरांचा, शेती कामाचा व गाव सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे गावकºयांनी निवेदनात म्हटले.

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मांगवाडी येथे रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट आरोग्य विभागातर्फे केली जाते. या टेस्टच्या अहवालावर गावकºयांनी शंका घेणे उचित नाही. शंकांचे निरसन आरोग्य विभागातर्फे केले जाते. गावकºयांचे समाधान केले जाईल. गावकºयांनीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे.- अजित शेलार,तहसिलदार रिसोड

सुरक्षिततेसाठी कोरोनाबाधित रुग्णाच्या हाय-रिस्क संपर्कातील नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट केली जात आहे. काही जणाचंी रॅपिड टेस्ट आणि त्यानंतर स्वॅब नमुने तपासणीसाठी यवतमाळ येथेही पाठविले होते. या दोन्ही ठिकाणच्या अहवाल एकच आहे. नागरिकांनी शंका, कुशंका घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. - डॉ. शंकर वाघ,तालुका आरोग्य अधिकारी रिसोड

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या