शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर पालिकेने चौकाचौकात उभारले सॅनिटायझर झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:07 IST

मंगरुळपीर नगर पालिकेनेही शहरातील प्रमुख चौकात ‘सॅनिटायझर’ झोन उभारले आहेत.

- नंदलाल पवार मंगरुळपीर (वाशिम) : कोरोना विषाणूपासून बचावासाठी, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता हा एकमेव उपाय असल्याने शासनाने पुढाकार घेतला आहे. मंगरुळपीर नगर पालिकेनेही शहरातील प्रमुख चौकात ‘सॅनिटायझर’ झोन उभारले आहेत. या ठिकाणाहून येजा करणाऱ्या नागरिकांना सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ व निर्जंतूक करण्याचे आवाहन पालिकेचे कर्मचारी करीत आहेत. पालिकेच्या या उपक्रमाची प्रशंसा होत आहे.मंगरुळपीर पालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकर व आरोग्य निरीक्षक राजेश संगत यांनी पोलीस व आरोग्य विभागाच्या सहकार्याने पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने आखलेले नियोजन शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहे.

पालिकेने भाजीपाला, किराणा व फळे विक्रीसाठी वेगवेगळे ठिकाण निवडून सुरक्षित अंतरावर दुकाने मांडण्याचे नियोजन केले आहे. या दुकानावर येणाºया नागरिकांनी अंतर राखावे, यासाठी दररोज चुन्याचा वापर करून चौकटी आखल्या जात असून, याच्या अमलबजावणीवर नियंत्रणासाठी पालिकेचे कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय संपूर्ण शहरात औषधांची फवारणी केली आहे. त्यात ‘लॉकडाऊन’ शिथिल असताना सकाळी ८ ते १२ दरम्यान नागरिकांचा वावर असल्याने पालिकेने शहरातील मुख्य चौकांत सॅनिटायझर झोन तयार केले आहे.

पालिकेचे कर्मचारीही तेथे तैनात असून, येथून जाणाºया नागरिकांना ‘सॅनिटायझर’चा वापर करून हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. शहरातील बिरबलनाथ मंदिर चौक, अकोला चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, मानोरा चौक, बसस्टँड परिसर इत्यादी ठिकाणी हे ‘सॅनिटायझर’ झोन उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या संसर्गापासून शहरातील नागरिकांचा बचाव व्हावा म्हणून पालिकेच्यावतीने शहरात तीन वाहनांद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊन घरात थांबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य निरीक्षक राजेश संगत यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर