शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून मंगरूळपीर, रिसोड ‘लॉकडाऊन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:56 IST

१५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जुलै महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर, रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. वाशिम, मालेगाव, कारंजा व मानोरा या शहरांमध्ये सुद्धा लॉकडाऊनची सुधारित नियमावली लागू होणार आहे. या चारही शहरांमधील यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना सुरु ठेवण्याचा कालावधी १५ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर सर्व आस्थापना, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी लोकांनी फिजिकल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मंगरूळपीर आणि रिसोड या दोन शहरांमध्ये १५ जुलै ते २१ जुलै २०२० या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे.

‘लॉकडाऊन’च्या कालावधीत बँक व्यवहारही बंद राहणारमंगरूळपीर व रिसोड शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच राष्ट्रीयकृत बँकांसह अन्य बँकांमध्येही ग्राहक, शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात मंगरूळपीर व रिसोड शहरातील सर्व बँक शाखा बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांना राष्ट्रीयकृत बँक खात्यातून १० हजार रुपये पर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे.राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाºया नागरिकांना आपल्या खात्यातून घरबसल्या रक्कम काढावयाची असल्यास त्यांनी अकोला डाक विभागाचे प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयातील ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक व आवश्यक असलेल्या रक्कमेची माहिती नोंदवावी. त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जावून रक्कम अदा करण्याची कार्यवाही करेल. सकाळी ७ ते १० वाजतापर्यंतच्या काळात एटीएममधून पैसे काढण्यास मुभा राहील, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरRisodरिसोडcorona virusकोरोना वायरस बातम्या