लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : इंडिका व क्रूझर या दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना १३ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली. नरेश देविदास राऊत (२७) व दिपक श्रीराम घोडे (३२) रा.मंगरूळपीर अशी मृतकांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद देविदास राऊत (३५) रा.मंगरूळपीर यांनी तक्रार दिली की, १३ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी एम.एच. ३७ बी ८२२० या क्रूझर वाहनाच्या चालकाने निष्काळजी व भरधाव वाहन चालवून एम. एच. २३ ई ८३१६ या इंडिका कारला जबर धडक दिली. यामध्ये कारमधील नरेश देविदास राऊत (२७) व दिपक श्रीराम घोडे (३२) दोघेही रा.मंगरूळपीर यांचा जागीच मृत्यु झाला. या तक्रारीहून मंगरूळपीर पोलिसांनी क्रूझर चालक सुरज पवार रा. कारंजा याचेविरूध्द भादंवी कलम २७९, ३३७, ३०८, ८०४ अन्वये गुन्हा दाखल केला.दरम्यान, या अपघातात क्रूझर वाहनाचा चालक सुरज पवार रा.कारंजा व अमोल रावपलाई, आदेश कांबळे, चेतन चरावंडे, श्याम पवार, समाधान पवार, ओम पवार, रा. मंगरूळपीर हे सात जण जखमी झाले आहेत. लक्झरी वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सदर अपघात झाल्याचे समजते.
मंगरूळपीर : इंडिका व क्रूझरच्या अपघातात दोन जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:09 IST
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : इंडिका व क्रूझर या दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन दोन जण जागीच ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना १३ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली. नरेश देविदास राऊत (२७) व दिपक श्रीराम घोडे (३२) रा.मंगरूळपीर अशी मृतकांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ...
मंगरूळपीर : इंडिका व क्रूझरच्या अपघातात दोन जण जागीच ठार
ठळक मुद्दे मंगरूळपीर शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर घडली घटना नरेश देविदास राऊत व दिपक श्रीराम घोडे अशी मृतकांची नावे सात जण जखमी