शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मंगरुळपीर बाजार समिती आठवड्यापासून बंदच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:19 IST

मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्या

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून मंगरुळपीर बाजार समिती बंदच आहे. त्यात शनिवार, रविवार हे दिवस सुटीचे असल्याने आता सोमवारीही बाजार समिती सुरू होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, व्यापारी, अडत्यांच्या व्यवहारामुळे शेतकºयांचे मात्र नुकसान होत आहे.  मंगरुळपीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाºया व्यापाºयांनी अडत्यांकडून मालाची उचल केली; परंतु महिनाभरापासून अडत्यांचे पैसेच दिले नाहीत. परिणामी अडत्यांना शेतकºयांसोबत व्यवहार करणे कठीण झाले आहे. बाजारात शेतमाल घेऊन येणाºया शेतकºयांनी अडत्यांकडे शेतमाल टाकल्यानंतर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते.  या मालाचा लिलाव झाल्यानंतर अडत्याकडून शेतकºयांना एक टक्का अडतीची रक्कम कापून चुकारे करण्यात येतात, तर शेतमालाची खरेदी करणारे व्यापारी अडत्यांना सात दिवसांच्या मुदतीत शेतमालाची रक्कम देतात. यावरच बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि व्यापाºयांचे व्यवहार चालतात; परंतु मंगरुळपीर बाजार समितीअंतर्गत गेल्या महिनाभरापासून अडत्यांकडून शेतमालाची खरेदी करूनही व्यापाºयांनी त्यांचे चुकारे केले नाहीत, तर अडत्यांनी मात्र शेतकºयांच्या रकमेचे चुकारे केले आहेत. आता पुढील व्यवहारासाठी त्यांच्याकडे रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच व्यापारी चुकारे करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे अडते संघटनेने बाजार समिती सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तथापि, अद्यापही व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे न दिल्याने बाजार समितीमधील खरेदीचे व्यवहार बंदच आहेत. या प्रकारामुळे शेतकºयांचे मात्र नाहक नुकसान होत असून, रब्बी हंगामातील हरभरा, गहू पिकांवर फवारणी करणे, खत देणे आदि कामांसाठी त्यांना पैशांची अडचण भासत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती