शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

VIDEO- गावाची पाणीटंचाई मिटविण्याचा त्याने उचलला विडा, एकटाच करतोय गावतलावाचे खोलीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 15:19 IST

गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही.

- नाना देवळे 

वाशिम: गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही. अखेर दयाराम राठोड यांनी  गावाची पाणीटंचाई कायम मिटविण्याचा विडा उचलला असून, ते एकटेच गावतलावाचे खोलीकरण करीत आहेत. हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि तेवढेच प्रेरणादायक चित्र आहे. मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू या गावाचे. 

राज्यातील दुष्काळाची झळ सोसणाऱ्या राज्यातील गावांत पाणी फाऊंडेशनच्या संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील माळशेलू या गावाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला खरा; परंतु श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मात्र ग्रामस्थ कमालीचे उदासीन आहेत. जवळपास १८०० लोकसंख्या असलेल्या माळशेलूत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना वारंवार सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील दयाराम राठोड यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या टीमच्या सहकार्याने या वॉटर हिरोने ग्रामस्थांना जलसंधारणाची कामे करण्यासाठी वारंवार प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. गावशिवारात पाणलोट उपचार व जलसंधारणासोबतच मनसंधारण व्हावे, याकरीता गावात दवंडी देऊन सभा घेतली गावकºयांना जलसंधारणाचे महत्व पटवून दिले; परंतु या गावातील लोकांकडून कवडीचाही प्रतिसाद त्याला लाभला नाही. त्यामुळे दयाराम राठोड यांनी स्वत:च जलसंधारणाच्या कामासाठी एकट्यानेच श्रमदान करण्याचा विडा उचलला. दयाराम राठोड यांनी प्रथम एकट्याच्याच श्रमदानातून स्वत:च्या घरी शोषखड्डा खोदला. तेवढ्यावर न थांबता त्यांनी गावतलावात अधिक पाणी साठविले जावे म्हणून या तलावाचे खोलीकरण सुरू केले ओ. गेले आठ दिवस ते एकटेच रखरखत्या उन्हात या तलावाचे खोलीकरण करीत आहेत. गावकºयांना जलसंधारणाच्या कामासाठी प्रेरित करता यावे म्हणून दयाराम राठोड यांनी ६ हजार रुपये खर्चून एक स्मार्ट फोनही विकत घेतला; परंतु गावकऱ्यांनी त्यापासून प्रेरणा घेणे, तर सोडाच उलट. त्याच्यावर आरोप करणे सुरु केले आहे. या कामाचा त्याला मोठा मोबदला मिळणार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या आरोपामुळे दयाराम खिन्न झाले असले तरी, श्रमदानात मात्र त्यांनी कोणतीच कसर येऊ दिली नाही. 

मला गावाची समस्या दूर करायचीयगावकरी काहीही म्हणोत. कदाचित त्यांचा गैरसमज दूर करण्यात किंवा त्यांना प्रेरित करण्या इतपत माझ्याकडेच ज्ञान नाही. तथापि, त्यांच्या आरोपांमुळे मी खिन्न होत असलो तरी, त्याचे वाईट मात्र मला वाटत नाही. हे गाव माझे आहे. त्यामुळे गावकºयांसोबतही नाते आहेच. त्यासाठीच गावतलावाचे खोलीकरण करून गावाची समस्या मला दूर करायची आहे. मी यात यशस्वी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसतील. गावकºयांना त्याचा फायदा होईल, असा मला विश्वास आहे, अशी भावूक प्रतिक्रिया दयाराम राठोड यांनी दिली आहे.