शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पात महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 15:38 IST

मालेगाव (वाशिम) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

ठळक मुद्दे२५ हजारांपेक्षा अधिक शहरवासीयांना आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे.मालेगावला चाकातिर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पुरक पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नगर पंचायतने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. आगामी महिनाभरात प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार .

मालेगाव (वाशिम) : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत असून आगामी महिनाभर पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी, २५ हजारांपेक्षा अधिक शहरवासीयांना आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत असून लवकर प्रभावी उपाययोजना न केल्यास पाण्यासाठी हाहा:कार माजणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजारांपेक्षा अधिक असून कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून शहरास पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पर्जन्यमान घटण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे धरणातून अवैधरित्या पाणी उपसा झाला. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट झाली. सद्या तलावात पुढील एक महिना पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.दरम्यान, पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता मालेगावला चाकातिर्थ लघुपाटबंधारे प्रकल्पावरून पुरक पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नगर पंचायतने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यास मात्र अद्याप मंजुरात मिळाली नसून आगामी महिनाभरात प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्यास मालेगावकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मालेगाव शहरातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी चाकातिर्थ लघुपाटबंधारे तलावातून कुरळा लघुपाटबंधारेच्या विहिरीत पाणी आणावे लागणार आहे. त्यासाठी तात्पुरत्या पुरक पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी १० लाख रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव जिल्ह्याधिकाºयांनी मंजूर केला असून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचा चाकातिर्थ ते मालेगाव शहर असा ३४ कोटी रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. दोन्ही प्रस्तावांना मात्र अद्याप शासनाची मंजुरात मिळालेली नाही.- मीनाक्षी परमेश्वर सावंत, नगराध्यक्ष, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमDamधरण