शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव बाजार समिती : सभापतीपदी प्रमोद नवघरे, उपसभापतीपदी गणपतराव गालट अविरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:22 IST

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ जुलै पार पडली असून, सभापतीपदी आमदार अमित झनक गटाचे डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव यांच्या गटाचे गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाली.

ठळक मुद्देसभापती बबनराव चोपडे व उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी नियोजित कार्यकाळ संपुष्टात आल्याने आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले होते. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. सभापतीपदी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

मालेगाव : मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक २ जुलै पार पडली असून, सभापतीपदी आमदार अमित झनक गटाचे डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे दिलीप जाधव यांच्या गटाचे गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाली.मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालिन सभापती बबनराव चोपडे व उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी नियोजित कार्यकाळ संपुष्टात आल्याने आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले होते. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक घेण्यात आली. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. झनक, जाधव गटाकडे १३ संचालक तर विरोधी गटात पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटात रा.काँ. पक्षाचे पाच संचालक काँग्रेस पक्षाचे चार संचालक, शिवसेनाचे एक संचालक, व्यापारी वर्गातून दोन संचालक तर हमाल व मापारी गटातून एक संचालक आहेत तर विरोधी गटात माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक, आमदार विनायक मेटे समर्थक भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव समर्थक या सर्वांमिळून पाच संचालक आहेत.राष्ट्रवादीच्या  दिलीप जाधव यांच्या गटाकडे सुरूवातीला सभापती पद दिले होते तर आमदार झनक यांच्या गटाकडे उपसभापतीपद होते. आता आमदार झनक यांच्या गटाकडे सभापतीपद तर जाधव यांच्या गटाकडे उपसभापतीपद देण्यात आले. झनक व जाधव गटाकडून नावे निश्चित झाल्यानंतर सोमवारी सभापतीपदासाठी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापती पदासाठी गणपतराव गालट यांनी अर्ज सादर केला तर विरोधी गटाकडून सभापती पदासाठी प्रदीप कुटे आणि उपसभापतीपदासाठी नारायण आदमणे यांनी अर्ज भरले होते. त्यानंतर विरोध गटाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी डॉ. प्रमोद नवघरे तर उपसभापतीपदी गणपतराव गालट यांची अविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले.

टॅग्स :MalegaonमालेगांवElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड