शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

मालेगाव घटनेचे पडसाद : रेशनच्या ‘पॉस मशीन’ परत करण्याचा निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 03:01 IST

वाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद  शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगमधील चुकांचा पाढा वाचला. जोपर्यंत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगचे १00 टक्के काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्राहकांना बिल बुकावरून धान्य देण्याची परवानगी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ‘पॉस मशीन’ तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला. 

ठळक मुद्देस्वस्त धान्य दुकानदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव येथे गुरुवारी स्वस्त धान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड व धान्य वाटपावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद  शुक्रवारी जिल्हय़ात उमटले. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगमधील चुकांचा पाढा वाचला. जोपर्यंत शिधापत्रिका व आधार कार्ड लिंकिंगचे १00 टक्के काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्राहकांना बिल बुकावरून धान्य देण्याची परवानगी द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. दरम्यान, मालेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने ‘पॉस मशीन’ तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला. मालेगाव येथील घटनेचा धागा पकडून १२ जानेवारीला स्वस्त धान्य व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी दुकानदारांनी बायोमेट्रिक पद्धतीने रेशन धान्य वितरणात येणार्‍या अडचणींचा पाढा वाचला. साधारणत: अडीच ते तीन वर्षांपूर्वी शिधापत्रिकाधारकांचे संगणकीकरणाचे अर्ज भरून घेण्यात आले. या अर्जावर कुटुंबातील प्रमुख, महिलांचे छायाचित्र, अन्य सदस्यांचे आधारकार्ड, बँक खाते क्रमांकाची झेरॉक्स जोडून इत्थंभूत माहितीसह सदर अर्ज तहसील कार्यालयात सादर केले. तहसील कार्यालय येथून सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात संगणकीकृत काम करताना या अर्जांमध्ये अनेक चुका झाल्याचा आरोप यावेळी दुकानदारांनी केला. काही शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची नोंद झाली नाही तर काही एपीएलचे कार्ड शुभ्र योजनेत समाविष्ट केले तर काही एपीएल कार्ड अंत्योदयमध्ये तर काही अंत्योदयचे कार्ड एपीएलमध्ये समाविष्ट केल्याने घोळ निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या चुकांची दुरुस्ती व्हावी म्हणून परत एकदा स्वस्त धान्य दुकानदारांनी शिधापत्रिकांची अचूक व इत्थंभूत माहिती सादर केली. त्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयात रेशन कार्ड व आधार सिडिंगचे काम करताना चुका झाल्याचे निदर्शनात आणून दिले. या चुकांमध्ये घोळ निर्माण होत असल्याचा दावा यावेळी दुकानदारांनी केला. ‘पॉस मशीन’शिवाय धान्य पुरवठा करू नका तसेच मशीनमधून जेवढा माल निघतो, तेवढाच माल संबंधित व्यक्तींना देण्यात यावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा विभागाने दिलेले आहेत. दुकानदारांकडून किरकोळ त्रुटी राहिल्या तर थेट दंडात्मक कारवाई केली जाते. दुसरीकडे आधार सिडिंगमधील चुकांमुळे ग्राहकांच्या रोषालादेखील बळी पडावे लागत आहे. यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले. मालेगाव येथील प्रकारही या चुकांमुळे घडला असून, दुकानदाराला ग्राहकाच्या रोषाला बळी पडावे लागले, असे दुकानदारांनी निवेदनात नमूद केले. याप्रकरणी दुकानदारांना न्याय द्यावा, आधार लिंकिंगमधील चुकांची दुरुस्ती करावी, पॉस मशीनसंदर्भात योग्य निर्णय घ्यावा, आदी मागण्या केल्या.

टॅग्स :washimवाशिम