शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव रुग्णालयाच्या अधीक्षकांचा प्रभार काढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:56 IST

मालेगाव: मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रभारी अधीक्षकांचा प्रभारही काढला.

ठळक मुद्देसीएस यांनी घेतला आढावा आमदार झनक यांच्याकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रभारी अधीक्षकांचा प्रभारही काढला.तीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते. येथे जनरेटरची सुविधा नाही. त्यामुळे वीजपुरवठा गूल झाला तर रात्री रुग्णांना अंधारातच राहावे लागते. ‘ईसीजी’ मशीन बंद आहे. पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही. यासह वैद्यकीय अधिकारी  व कर्मचारीदेखील सोयीनुसार रुग्णालयात येत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १0 वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला. कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचार्‍यांनी रुग्णालयातच राहावे, अशा सूचना देतानाच, निवासस्थानी न राहणार्‍या कर्मचारी-अधिकारी तसेच दांडीबाज कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा डॉ. राऊत यांनी दिला. तसेच मालेगाव येथील प्रभारी अधीक्षकपदाचा पदभार डॉ. अविनाश झरे यांच्याकडून काढला असून, सदर प्रभार डॉ. संदीप वाढवे यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी पं.स. सभापती मंगला गवई, नितीन काळे, नगर पंचायतचे आरोग्य सभापती गजानन सारस्कर, संतोष बनसोड आदींची उपस्थिती होती. यावेळी दक्षता समिती सदस्य नितीन काळे यांनीदेखील वरिष्ठांकडे ग्रामीण रुग्णालयातील विविध गैरसोयींसंदर्भात माहिती दिली. दुपारच्या सुमारास आमदार अमित झनक यांनीदेखील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करीत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत समस्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या. 

टॅग्स :washimवाशिम