शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 14:40 IST

मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत.

ठळक मुद्दे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे.

 मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. या वातावरणाचा परिणात दिवसा चालणाºया विविध व्यवसायांवर होत असल्याचे दिसत आहे.  उन्हाच्या लाटेमुळे जिवाची लाही लाही होत आहे. त्यामुुळे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर होत असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी थंडपेयांचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मालेगाव तालुक्यात उष्णतेची लाट असून, दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेताना दिसतो. उन्हामुळे सावलीत बसूनही झळा सोसणे कठीण होत असून, यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असेल त्या ठिकाणीच उभे राहणे पसंत करीत आहेत. उन्हाच्या लाटेमुळे एव्हाना वर्षभर गजबजून राहत असलेली शासकीय कार्यालयेही ओस पडल्याचे दिसत आहे.  उपाहारगृहे पडली ओसवाढत्या तापमानामुळे  दुपट्टे व रुमाल गुंडाळून घराबाहेर पडावे लागत आहे. दुपारच्या वेळेत सहसा महत्त्वाचे काम वगळता इतर कामांसाठी बाहेर पडण्यास नागरिक तयार नाहीत. तालुक्यातील खेड्यांपाड्यांतूनही कामानिमित्त येणाºया ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी उपहारगृहेही ओस पडली असून, दिवसभर फरसान आणि फराळाचे इतर पदार्थ विकून गुजराण करणाºयांवर उपासमारीचीच पाळी आली आहे. चहाची मागणी घटून शीतपेयाची मागणी वाढली असली तरी, दुपारच्या वेळेत शीतपेयांच्या दुकानांतही नावापुरतेच ग्राहक पाहायला मिळत आहेत. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र आंब्याचा रस, उसाचा रस, ताक, लस्सी, निंबू सरबत घेण्यासाठी चौकात असलेल्या दुकानांमध्ये, हातगाड्यावंर लोकांची गर्दी दिसत आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवwashimवाशिमHeat Strokeउष्माघात