शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल तारण योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा - गोपाल राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:42 IST

वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत:  मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री  सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. 

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांकडे साकडेमालेगाव बाजार समिती संचालकांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव:  वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत:  मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री  सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख सहकार व पणन विषयक योजनांचा आढावा घेण्यासाठी वाशिम जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी वाशिम जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच गोपाल राऊत यांनी सदर मागणी केली. गोपाटी पाटिल पुढे म्हणाले कि जिल्ह्यातील शेतकºयांना त्यांचा शेतमाल खाजगी गोदामात ठेऊन त्यावर बँकेमार्फत १२  ते  १४ टक्के व्याजदराने  कर्ज  घ्यावे लागते; परंतु शासनाने सुरु केलेल्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये फक्त ६ टक्के व्याजदर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा होऊ शकतो. तेव्हा या योजनेचा  लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना मिळण्यासाठी निधी तात्काळ देऊन शेतकºयांचे हित जोपासावे अशी मागणी केली. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन मालेगाव बाजार समितीला १ कोटी रूपये शेतमाल तारण योजनेसाठी तात्काळ देण्याचे आदेश संबंधितांना दिले व तसे कर्ज मागणीचे प्रस्ताव शासनाकडे  दाखल करण्याचे आदेश सचिवांना  देण्यात आले. सदर योजनेसाठी मालेगाव व रिसोड बाजार समितीला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी हमीही दिली. या आढावा सभेला खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्ह्यातील बाजार समितीचे सभापती व सचिवांची उपस्थिती होती.  

टॅग्स :washimवाशिमSubhash Deshmukhसुभाष देशमुख