शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायम मिश्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:45 IST

वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.

ठळक मुद्दे३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या पृष्ठभूमीवर ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी मिश्रा पुढे म्हणाले की, गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे करून त्यांचे पावित्र्य अबाधित राखावे. गणेशोत्सव काळात समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींनी तातडीने भरून घ्यावेत. तसेच या मार्गावर व विसर्जन स्थळी विद्युत दिवे बसवून पुरेशी विद्युत व्यवस्था करावी. वाशिम व इतर शहरांमध्ये विसर्जन स्थळी अग्निशमन दल व आरोग्य पथक तैनात करण्यात यावे.नगर परिषद क्षेत्रामधील विसर्जन मिरवणूक मार्ग व इतर संवेदनशिल ठिकाणी नगरपरिषदांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या मंडपमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना पोलीस प्रशासनाकडून आलेले प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय