शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्री : भाविकांच्या गर्दीने गजबजली वाशिम जिल्ह्यातील शिवालये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:25 IST

वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीला जिल्हाभरातील शिवालयांवर भोळ्या शंकराच्या दर्शनासाइी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकट्या वाशिम शहरात अकरा पूर्ण आणि एक अर्धे असे एकूण साडेअकरा स्वयंभू शिवलिंग आहेत.सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीच्या औचित्यावर मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती.महिला-पुरूष भाविकांना यादिवशी उपवास असल्याने साबुदाणा ऊसळीचे वितरण करण्यात आले.

वाशिम : महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीला जिल्हाभरातील शिवालयांवर भोळ्या शंकराच्या दर्शनासाइी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. यानिमित्त अनेक मंदिरांवर उपवासाच्या फराळाचे वितरण झाले. १४ फेब्रुवारीला यानिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.जिल्ह्यातील एकट्या वाशिम शहरात अकरा पूर्ण आणि एक अर्धे असे एकूण साडेअकरा स्वयंभू शिवलिंग आहेत. याशिवाय जिल्ह्यातील इतर ठिकाणीही प्रसिद्ध शिवमंदिरे असून सर्वच ठिकाणी महाशिवरात्रीच्या औचित्यावर मंगळवारी दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. बहुतांश महिला-पुरूष भाविकांना यादिवशी उपवास असल्याने साबुदाणा ऊसळीचे वितरण करण्यात आले. बुधवारी वाशिममधील पाळेश्वर संस्थान, मालेगावातील तामकराड यासह इतरही अनेक मंदिरांवर भव्यदिव्य स्वरूपात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रिसोड शहरात संत अमरदास बाबा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. १४ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद वितरण असून, सध्या महाप्रसादाची जय्यत तयारी सुरू आहे. पंचक्रोशीतील महिला या  पुरी लाटून देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या असल्याचे दिसून येते.  संत अमरदास बाबा संस्थानच्यावतीने महाप्रसादाचे नियोजन चोख बजावण्यात येते. पूरी ४५ क्विंटल,  बुंदी १५ क्विंटल, भाजी २५ क्विंटल असा महाप्रसाद वितरित केला जाणार आहे. जवळपास २१ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीwashimवाशिम