शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजकडे गव्हाच्या बियाण्यांचा तुटवडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:21 IST

नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा वाशिम जिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरनंतर आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे जलाशय तुडूंब भरले असून, विहिरी, कूपनलिकांची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गहू पिकाला पाणी देणे शक्य असल्याने शेतकरी याच पिकाच्या पेरणीवर भर देत आहेत. तथापि, पेरणीची वेळ संपत येत असतानाही महाबीजकडे या पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाशिम जिल्ह्यात महाबीजच्या प्रकल्पांतर्गत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी केली जाते. या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर १ क्विंटलप्रमाणे १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असते. त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाने नियोजन करून वरिष्ठस्तरावर बियाणे उपलब्ध करण्याची मागणीही केली आहे. तथापि, नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे. महाबीजच्यावतीने प्रामुख्याने लोकवन, ६२२२, फुले नेत्रावती, त्र्यंबक, एचडी २१८९, डीब्ल्यू ४९६, या वाणांचा बिजोत्पादन प्रकल्पासाठी वापर केला जातो; परंतु गतवर्षी राज्यभरात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पातील बियाणे तपासणीदरम्यान नापास झाले अर्थात, गतवर्षी गहू बियाण्यांची क्षमता आवश्यकतेपेक्षा कमी आढळून आली. त्यामुळे महाबीजला आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करता आले नाही. त्यामुळे महाबीजला इतर बियाण्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी नियोजनही केले असले तरी, वेळेवर बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. वाशिम जिल्ह्यात साधारण डिसेंबरच्या मध्यंतरापर्यंत गहू पिकाची पेरणी केली जात असते. तथापि, अद्याप आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले नाहीत. अद्यापही महाबीजकडे साधारण सहा हजार क्विंटल गहू बियाण्यांचा तुटवडा असून, आता वेळ निघून गेल्यावर बियाणे उपलब्ध झाल्यास महाबीजला ते बियाणे बाजारात लिलावाद्वारे विकावे लागण्याची शक्यता आहे.  हार्वेस्टरच्या वापराचा परिणाममहाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पात गहू पिकाची पेरणी करणारे शेतकरी गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर अधिक करतात. या पद्धतीमुळे गहू पिकाची काढणी झपाट्याने आणि कमी खर्चात होत असली तरी, या पद्धतीमुळे गहू बियाण्यांचा दर्जा खालावतो. गव्हाच्या नख्या हार्वेस्टरमुळे तुटल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी होते. याच पद्धतीचा वापर गतवर्षी बहुतांश शेतकºयांनी केल्यामुळे त्यांचे बियाणे तपासणीत सदोष आढळून आले आणि महाबीजकडे गहू बियाण्यांचा यंदा तुटवडा निर्माण झाला.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज