शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टेभूर्णा घटनेच्या चौकशीसाठी मंगरुळपीरातील वडार समाज आकम्रक; तहसीलदारांना दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 21:11 IST

मंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. संदर्भात ६ फेब्रुवारीला वडार समाज संघाच्या वतीने मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण घटनेची सीबीआयमार्फत न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची चौकशी संथगतीने होत असल्याने वडार समाजाने आक्रमक पावित्रा घेतला असून, या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात ६ फेब्रुवारीला वडार समाज संघाच्या वतीने मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, लातूर जिल्ह्यातील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेतील आरोपीना अटक करण्यात पोलीस हलगर्जीपणा करीत आहेत. या घटनेत काही धनदांडग्यांचा सहभाग असल्याची शक्यता असून, या घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेतील दोषींना पाठिशी घालणाºया पोलीस अधिकाºयांना निलंबित करावे, घटनेची सीबीआयमार्फत न्यायालयीन चौकशी करावी, मारेक-यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवावा अशा मागण्याही या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर संघटनेचे महादेव कुसळकर, सुखदेव फुलारे, मुकुंदराव दाते, संजय कोंबेकर, किसन पिटकर आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन