शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

दुधाला अल्प दर; दुधाळ जनावरे पोसणे झाले कठीण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 3:42 PM

शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. जनावरांचे पालन आणि खाद्यावर होणारा खर्चही वसूल होणे कठीण झाल्याने दुधाळ जनावरे पोसणे अशक्य झाल्याचा सूर पशुपालकांमधून उमटत आहे.वाशिम जिल्ह्यात तुलनेने सर्वाधिक दुधाळ जनावरे शिरपूर व परिसरातील गावांमध्ये आहेत. यामाध्यमातून निर्मित होणाºया दुधाची विक्री शिरपूर येथील डेअरीत केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दुधाला योग्य दर मिळणे दुरापास्त झाले आहेत. सद्य:स्थितीत म्हशीच्या दुधासाठी प्रती फॅट पाच रुपये असा दर मिळत असून तो महागाईच्या या काळात कदापि न परवडणारा असल्याचे दुग्धोत्पादक शेतकºयांचे म्हणणे आहे. खुल्या बाजारात याच प्रतीचे दुध ४० ते ५० रुपये प्रतिलिटरने विकले जाते. मात्र, ज्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते, त्याप्रमाणात खुल्या बाजारात विक्रीची सोय उपलब्ध नसल्याने दुग्धोत्पादक शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. तथापि, डेअरीमध्ये दुधाला मिळणाºया अल्प दरामुळे दुग्धोत्पादक शेतकºयांचा दैनंदिन खर्च वसूल होणे कठीण झाले. दुध उत्पादक संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम येथील शासकीय दुध संकलन केंद्रात केवळ २०० लीटर दुध स्विकारले जात असल्याने समस्या वाढली आहे. 

मागील काही दिवसांपासून शिरपूर येथील दुध उत्पादक संघाकडून सहा फॅट असलेले म्हशीचे दूध केवळ तीस रुपये लिटरप्रमाणे खरेदी केले जात आहे. हा दर अगदीच कमी असल्याने दुध उत्पादक शेतकºयांचा खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे. दुसरीकडे हेच दुध उत्पादक संघ शिरपूर व परिसरातील ग्राहकांना ५० रुपये लीटरने देऊन वरचेवर नफा कमवित आहे. - आशिष देशमुख, शेतकरी, शिरपूरजैन

मी दररोज शासकीय दुध डेअरीमधून ५० रुपये लिटरप्रमाणे दुध विकत घेत असतो. दुध उत्पादक शेतकºयांकडून कमी दराने खरेदी करण्यात येणाºया दुधाची अशी चढ्या भावाने विक्री होत असेल तर हा गंभीर प्रकार असून दुग्धोत्पादकांना याचा फायदा मिळायला हवा. - संतोष पवारनागरिक, शिरपूरजैन

टॅग्स :washimवाशिमmilkदूध