शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये निचांकी रुग्णसंख्या; निर्बंधातून सुट केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:44 IST

Low patient numbers in July : ३१ दिवसांत २४६ अर्थात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जुलै महिन्यात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. मात्र, जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने या निर्बंधामधून सूट केव्हा मिळणार, याकडे व्यापाऱ्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८,९३४ होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जुलै महिन्यात तर निचांकी संख्येत रुग्ण आढळून आले. ३१ दिवसांत २४६ अर्थात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे तर शनिवार व रविवार अशा दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अर्थचक्र प्रभावित झाले होते. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरीत दुकाने अधिकाधिक दिवस बंदच राहिल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. दुसरी लाट ओसरल्याने अर्थचक्राला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी म्हणून निर्बंधातून सूट मिळावी असा सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसºया लाटेत उद्योग क्षेत्राला जबर फटका बसला. जुलै महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत अतिशय घट आल्याने सर्व निर्बंध हटविणे अपेक्षीत आहे. अनलॉक केल्यास उद्योग क्षेत्राला उभारी मिळू शकेल. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यासाठी व्यापारी, विक्रेते कटीबद्ध राहतील.- आनंद चरखाजिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंधातून सुट मिळणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिक व व्यापारी कोरोनाविषयक नियमांचे पालन करतील. लसीकरणाला गती मिळण्यासाठी लसींचा आवश्यक पुरवठा व्हावा. वाशिम येथे गर्दीच्या ठिकाणी आठवड्यातून एका दिवशी लसीकरण शिबिर घ्यावे.- मनिष मंत्रीजिल्हा सचिव, व्यापारी मंडळ

जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी संख्येत येत असल्यामुळे केवळ रविवारी कडक निर्बंध ठेवावे. उर्वरीत दिवशी सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व व्यापार, उद्योग, दुकाने सुरू ठेवण्यास शासन, प्रशासनाने परवानगी द्यावी. शेवटी अर्थचक्राला गती मिळणेही आवश्यकच आहे. व्यापारी, नागरिकदेखील आवश्यक ती खबरदारी घेतील.-  विनोद बसंतवाणीव्यापारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या