शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे ८५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:45 IST

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज चमूतर्फे पंचनाम्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

जिल्हयात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपीटही झाली. मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारासदेखील वाशिम शहरासह रिसोड व मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती वाढली असून, शेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात आहेत. गारपिट व अवकाळी पावसामुळे रिसोड व मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अंतिम अहवाल हाती आल्यानंतर यामध्ये बदलही होऊ शकतो, असे गावसाने यांनी स्पष्ट केले. 

लेखी आदेशच नाहीतदरम्यान, काही ठिकाणच्या तलाठी व कृषी सहायकांना पंचनाम्यासंदर्भात अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे. लेखी आदेश नसल्याने सोमवारी अनेक ठिकाणी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भागांची केवळ पाहणी करण्याचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांना विचारणा केली असता, तालुका स्तरावरून तहसिलदार व तालुका कृषी अधिका-यांकडून सोमवारी सायंकाळपर्यंत लेखी आदेश दिले जातील,  असे सांगितले.

मुंगळा परिसरातही प्रचंड नुकसानमालेगाव तालुक्यातील मूंगळा, खेर्डी, रेगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. १२ फेब्रुवारी रोजी मुंगळा परिसराला भेट देऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी केली. मात्र, पंचनामा केला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखी आदेश प्राप्त होताच, पंचनामे केली जातील, असे तलाठी गजानन उमाळे, कृषी सहायक संजय जहागीरदार, भारत लहाने यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम