शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतचा प्रभाव : अखेर एकांब्याची जिल्हा परिषद शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:17 IST

लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देशाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती.या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली.

कमी पटसंख्येच्या नावाखाली केली होती बंदलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील १४ विद्यार्थी असलेली जि.प. शाळा कमी पटसंख्या असल्याचे कारणसमोर करून बंद करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने २२ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर ही शाळा २८ आॅगस्ट रोजी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून, पालकवर्गात समाधानाचे वातावरण आहे.कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सामाजिकरणावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजिकच्या शाळांत करण्याचे शासनाचे निर्देश होते. या अंतर्गत १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच बंद करणे आवश्यक होते; परंतु मंगरुळपीर तालुक्यातील एकांबा येथील शाळेत १४ विद्यार्थी असतानाही कमी पटसंख्येच्या नावाखाली ही शाळा बंद करण्यात आली होती. त्यातच या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजनही करण्यात आले नव्हते. त्यामुळे या शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे शाळाबाह्य होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाने ही शाळा २८ आॅगस्ट रोजी सुरू केली. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान आता टळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा