शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट ! लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविले, रस्ता मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:03 IST

शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने

वाशिम - शहरातील सर्वात रहदारीच्या रस्त्यावर लघुव्यावसायिक, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करताच हे अतिक्रमण 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हटविण्यात आले आहे. यापूर्वीही अतिक्रमण हटविण्यात आले असून नियमित याकडे लक्ष ठेवल्यास या मोहिमेचा फायदा होवू शकतो, अशी प्रतिक्रीया नागरिकांत उमटत आहे.

शहरातील सर्वात रहदारीच्या पाटणी चौकामध्ये भर रस्त्यावर फेरीवाले, भाजीविक्रेते व काही व्यापाऱ्यांनी दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून अतिक्रमण केले. सदर अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर वाहतूक शाखेच्यावतीने वेळोवेळी राबविण्यात येते. मात्र, कारवाई नंतर परिस्थीती जैसे थे होत आहे. 6 सप्टेंबर रोजीही शहर वाहतूक शाखेच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. ही कारवाई झाल्याबरोबर काही वेळातच रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाले, भाजीवाले येवून बसत असल्याने या रस्त्यावर नियमित कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तांची काँग्रेस कमेटीच्यावतीने दखल घेवून जिल्हाधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली होती. रस्ता मोकळा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. 

शहर वाहतूक शाखेचा नुकताच पदभार मी स्विकारला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी व्यापाऱ्यांना, फेरीवाल्यांना व रस्त्यावर बसणाऱ्या लघुव्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत. नगरपरिषदेने लघू व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करुन दिल्यास हा प्रश्न त्वरित निकाली निघू शकतो. नगरपालिकेचे व नागरिकांचे सहकार्य लाभल्यास रस्त्यावरील वाहतूक समस्येचा प्रश्न निकाली निघण्यास वेळ लागणार नाही. मी 6 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेटून वाहतूक विस्कळीत होणार नाही, याबाबत सर्वांना सूचना केल्या आहेत. याउपरही कोणी नियमांचे भंग करेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.             - विनायक जाधवशहर वाहतूक शाखा निरिक्षक, वाशिम 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीLokmatलोकमतwashimवाशिम