शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

 लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:53 IST

वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अडोळी गावात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. गावाचा विकास साधण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधी पुरविला जातो. तसेच अन्य शासकीय योजनांतून निधी मिळतो. परंतू, अडोळी येथील समस्यांवर नजर टाकली असता, शासनाचा निधी गावात पोहचतो की नाही, असा प्रश्न  गावकºयांनी उपस्थित केला. गावातील मुख्य रस्त्यावर चिखल व पाणी साचले आहे. रस्त्यावरून चालायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानचा  हा रस्ता गावाचा प्रमुख असुन मुलांना शाळेत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ठाणेदार भारद्वाज यांनी अडोळी गाव गाठून सरपंच व ग्रामसेवकांना रस्ता कामासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरु झाले आहे, अशी माहिती निवेदनकर्ते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत