शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिममध्ये युतीसमोर मते टिकविण्याचे आव्हान!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:40 IST

वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही  मते या लोकसभा निवडणुकीत मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, त्यामुळे युतीसमोर ही मते कायम राखण्याचे आव्हान आहे.  त्यामुळेच ही निवडणूक भाजप-सेनेच्या मंत्री, आमदार  तसेच गत विधानसभेतील पराभूत उमेदवारांची परीक्षा ठरणार आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  युतीच्या मतांचे विभाजन झाले. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या  मतदारांची खरी ताकद अधोरेखीत झाली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीची पाच लाख ३१ हजार २०२ मते हक्काची आहेत. त्यात सर्वाधिक दोन लाख ७३ हजार २९३ मते एकट्या भाजपाची आहेत. तर शिवसेनेच्या वाट्याला दोन लाख ५७ हजार ९०९ मते आली होती. यावरून या मतदारसंघात भाजपला मानणारा मतदारवर्ग ५१.४४ टक्के तर शिवसेनेला मानणारा ४८.५५ टक्के मतदारवर्ग आहे. विशेष म्हणजे,  सहा मतदारसंघात ४८ टक्के मते सेनेला मिळाली, तरी त्यांचा एकमेव उमेदवार विजयी झाला. या उलट अवघी ३ टक्के जास्त (५१ टक्के) मते मिळवून भाजपचे एक-दोन नव्हे, तर चार आमदार निवडून आले. ११ एप्रिलला यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे  काँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट लढत आहे. दोन्ही पक्षांना बंडखोराची भीती आहे; मात्र या मतदारसंघात युतीला मानणारे पाच लाख ३१ हजार २०२ मतदार आहेत. एवढी मते कायम राखण्यात भाजप-सेनेच्या नेत्यांनी यश मिळविले तरी सेनेचा  उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. या मतदारसंघात भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी एक राज्यमंत्री, भाजपचे आणखी तीन आमदार, एक विधान परिषद सदस्य अशी ताकद आहे. या सर्वांनी एकजुटीने व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे झोकून देत काम केल्यास लोकसभेत युतीचा विजय दूर नाही. वास्तविक सहा पैकी पाच आमदार युतीचे असल्याने लोकसभेच्या उमेदवाराला २०१४ च्या तुलनेत (९३ हजार) यावेळी मतांची आघाडी किमान दुप्पट होणे अपेक्षित आहे. कारण यावेळी पुसदमध्ये विधान परिषद सदस्याच्या रुपाने भाजपाची अतिरिक्त ताकद वाढली आहे. उच्चशिक्षित व राजकीय वारसा असलेल्या या नेत्याच्या झोळीत भाजपाने आपल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला सारुन थेट विधान परिषद सदस्यपद टाकले.  त्या मोबदल्यात विधान परिषद सदस्य युतीला आता पुसद विधानसभा मतदारसंघातून किती ताकद देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.  यावेळी या सदस्याच्या ‘परफॉर्मन्स’वर भाजपाची खास नजर राहणार आहे. गटबाजीमुळे ‘मातोश्री’ची नजर दिग्रस मतदार संघावरही राहणार आहे. तेथून सेनेला किती लिड मिळतो, हे महत्त्वाचे ठरते. 

टॅग्स :yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमwashimवाशिमcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBhavna Gavliभावना गवळीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक