शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या मतांवर भाजपा बंडखोराचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:54 IST

वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात विरोधी फॅक्टर, नाराज मतदार, दिसत नसलेला परफॉर्मन्स, मतविभाजन यामुळे शिवसेनेची मतांची मार्जीन मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे.

- नंदकिशोर नारे वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात विरोधी फॅक्टर, नाराज मतदार, दिसत नसलेला परफॉर्मन्स, मतविभाजन यामुळे शिवसेनेची मतांची मार्जीन मोठ्या प्रमाणात खाली येण्याची शक्यता आहे. त्याचा फटका एखादवेळी सेनेला पराभवाचा धक्काही देण्याची हूरहूर शिवसैनिकांमध्ये पहायला मिळते.शिवसेनेच्या भावनाताई गवळी पाचव्यांदा लोकसभेसाठी आपले नशीब आजमावित आहेत. त्यांची फाईट काँग्रेसच्या दिग्गज माणिकराव ठाकरे यांच्यासोबत आहे. २००९ च्या तुलनेत २०१४ ला भावनातार्इंच्या विजयी मतांची मार्जीन ५७ हजारांवरून थेट ९३ हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यासाठी मोदी फॅक्टर कारणीभूत ठरला. त्यावेळीही तार्इंच्या विरोधात नाराजी होतीच. मात्र मोदी लाटेत त्या तरल्या. आता मोदींची लाट ओसरली. खासदार म्हणून तार्इंना वाशिम जिल्ह्यात २० तर यवतमाळ जिल्ह्यात दहा वर्ष झाले आहेत. त्यांचा परफॉर्मन्स, जनसंपर्क दिसत नसल्याने मतदार नाराज आहेत. मात्र मतदारसंघातील भाजपाचे चार, सेनेचा एक शिवाय भाजपाचा एक एमएलसी तार्इंना कसे तारतात हे पाहणे महत्वाचे ठरते.त्यांच्या परफॉर्मन्सवर तार्इंच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. तार्इंना भाजपाच्या बंडखोरापासून अधिक धोका आहे. हा बंडखोर तार्इंना बराच मायनस करू शकतो.तार्इंच्या विरोधातील वातावरण, बंजारा समाजाला मिळालेला पर्याय, कुणबी समाजालाही असलेली चॉईस, काँग्रेसची परंपरागत गठ्ठा मते हीच काय ती काँग्रेसची जमेची बाजू आहे. काँग्रेसची सर्व मंडळी एकदिलाने काम करीत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तशी स्थिती आहे का याबाबत साशंकता आहे.कारण काँग्रेसमधील गटबाजी मतदारांनी अनेक वर्ष अनुभवली आहे. पक्ष संपायला आला पण गटबाजी संपायचे नाव घेत नाही, अशी काँग्रेसची स्थिती आहे. बसपा, वंचित आघाडी, तीन मुस्लीम उमेदवार काँग्रेसला मायनस करणारे आहे.चित्र बदलेल का? कसे? २००९ मध्ये काँग्रेस व राष्टÑवादीला विधानसभेच्या प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. २०१४ मध्ये मोदी लाटेत या लोकसभा मतदारसंघात सहा पैकी सर्वाधिक चार जागा भाजपाला मिळाल्या.आता २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला आपल्या तेवढ्या जागा कायम राखणे कठीण दिसते. या जागा काँग्रेस अथवा अन्य पक्षाकडून हिसकावून घेतल्या जाऊ शकतात.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक