शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown : वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजुरांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:30 IST

वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्य व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले मजूर गेल्या काही दिवसांपासून मिळेल त्या वाहनांनी आपापल्या गावी परतत आहेत; मात्र सर्वच वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे दाटीवाटीने वाहनांमध्ये कोंबून बसणारे अनेक मजूर ना तोंडाला मास्क लावत आहेत, ना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळत आहेत.जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्चपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू केला. सोबतच रेल्वे, बस यासह इतर सार्वजनिक वाहतूकीवर बंदी लादली. परिणामी, मोलमजूरीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये स्थलांतरीत झालेले कामगार, मजूरांचे कुटूंब त्याचठिकाणी अडकून पडले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शासनाने ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता देत मजूर, कामगारांना आपापल्या गावी परतण्याची परवानगी दर्शविली. यामुळे एकाचवेळी अनेक राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मजूरांचे जथ्थेच्या जथ्थे मिळेल त्या वाहनांमध्ये बसून आपापल्या गावी रवाना होताना दिसत आहेत; मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धोका झपाट्याने बळावत असतानाच ट्रक, कंटेनर यासह इतर वाहनांच्या आत व टपावर बसून क्षमतेपेक्षा अधिक मजूर प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, केनवड मार्गावर दिसून येत आहे. याहीपेक्षा भयावह स्थिती ही आहे, की दाटीवाटीने वाहनांमध्ये बसणाºया अनेक मजूर, कामगारांकडून ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसून अनेकजण तोंडाला मास्क देखील लावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मजूर प्रवाशांनी खचाखच भरून धावणाºया वाहनांना अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. असे असताना पोलिस प्रशासनाकडून मात्र या प्रकाराला मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकट काळात त्रस्त झालेले मजूर आपापल्या गावी पोहचणे महत्वाचे आहे; मात्र नियमापेक्षा अधिक वाहतूक करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिस प्रशासनाकडूनही याबाबत कारवाई करण्यात येईल.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार