शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’; रिसोड, मंगरूळपिरात चवथ्या दिवशीही सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 16:13 IST

चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असून, चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली. दरम्यान गत तीन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४० वर पोहचली असून, यापैकी १९७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा वेग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर, रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला होता. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या दोन्ही शहरांमध्ये महसूल व पोलीस प्रशासनातर्फे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दवाखाने व मेडीकलचा अपवाद वगळता उर्वरीत दुकाने बंद असल्याने बाजारपेठ तसेच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ६५ जणांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. सकाळी ७ ते १० या वेळेत दुध, भाजीपाला खरेदीसाठी रिसोड व मंगरूळपीर शहरात नागरिकांची काही प्रमाणात लगबग दिसून येते. शहरात येणाºया व शहरातून बाहेर जाणाºया प्रत्येकाची पोलीस पथकाकडून चौकशी केली जात आहे. कुणी विनाकारण फिरताना आढळून आल्यास समज देण्याबरोबरच दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे.दरम्यान, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असताना, रिसोड व मंगरूळपीर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. १७ जुलै रोजी रिसोड येथे आठ तर मंगरूळपीर येथे ११ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरRisodरिसोड