शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

LockDown Efect : रोजगार हिरावला; गोरखपूरच्या मजूरांची सायकलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 11:37 IST

मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.

- शंकर वाघ लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : कोरोना विषाणू संसर्गामुळे पुणे येथील एका कंपनीत कामाला असलेल्या उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील पाच ते सहा युवकांचा रोजगार गेला. मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या उत्तरप्रदेशातील ३० मजुरांच्या हातालाही काम नाही. अशा परिस्थितीत या मजुर व युवकांनी पुणे येथून औरंगाबाद, जालना मार्गे शिरपूर आणि त्यापुढे मालेगाव मार्गे आपल्या राज्याकडे परतीचा प्रवास सुरू केला. ११ मे रोजी सायकलस्वार युवकांनी शिरपूर परिसरात थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुढे ते मार्गस्थ झाले.रोजगारानिमित्त परराज्यातील अनेक कुटुंब महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विविध कंपन्या, उद्योग व्यवसायात कामगार म्हणून काम करीत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे उद्योग विश्वच संकटात सापडल्याने लॉकडाउनच्या कालावधीत उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. पुणे, मुंबई भागातील उद्योग व्यवसाय सुरू कधी होतील, याचा कोणताही अंदाज तुर्तास तरी बांधता येत नाही. रोजगार नसल्याने गोरखपूर येथील पाच ते सहा युवक तसेच उत्तर प्रदेशातील ३० मजुरांचे दोन वेळ जेवणाचेही वांधे झाले. आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी मिळाल्याने हे युवक व मजूर गोरखपूरकडे निघाले. यामध्ये तीन युवक सायकलवर तर उर्वरीत युवक व मजूर हे पायदळ गावाकडे निघाले आहेत. जेवनाची कोणतीही व्यवस्था नाही. जेथे मुक्काम केला जातो, तेथील गावकरी जेवनाची व्यवस्था करतात तर काही ठिकाणी अशी व्यवस्थाही नसते, असे एका मजुराने सांगितले. सोमवारी मजुरांनी शिरपूर परिसरात काही वेळ विश्रांती घेऊन मालेगाव मार्गे पुढे मार्गस्थ झाले.

उद्योग बंद; कामधंदेही बंदपुणे येथील एका कंपनीत कामाला असल्याने दर महिन्याला वेतन मिळत होते. कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाउन असल्याने पुण्यातील सर्व उद्योग धंदे, कंपन्या बंदस्थितीत आहेत. त्यामुळे मालकांनी बंद काळात वेतन देण्यास नकार दिला.उद्योगधंदे बंद आणि अन्य कोणतेही काम नसल्याने गावी परत जात असल्याचे मजुरांनी सांगितले.ना जेवण ना पाणी गोरखपूर येथील या युवकांकडे ना जेवणाची व्यवस्था आहे ना पिण्याच्या पाण्याची; मात्र तरीही त्यांनी सायकलने प्रवास सुरू केला. जालना जिल्ह्यातील देउळगाव येथे एका सहृदयी व्यक्तीने भोजन दिले होते. मधात काही जणांनी थोडाफार नाश्ता दिला. शिरपूर परिसरात सदर युवक आल्यानंतर त्यांची दयनिय परिस्थिती पाहून, त्यांना नाश्ता व भोजन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील मजुरांनादेखील नाश्ता व भोजन देण्यात आले. त्यानंतर ते पुढे मार्गस्थ झाले.

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगारShirpur Jainशिरपूर जैन