शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मुळे सर्जनशिलता वाढली - बाबाराव मुसळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:48 IST

लेखक आणि कवींचे लिखान थांबले की पुरेशी सवड मिळाल्याने लिखानाला गती मिळाली, आदींबाबत ज्येष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांच्याशी साधलेला हा संवाद...

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संपूर्ण जगाला हादरवून सोडणाºया कोरोना विषाणूच्या संकटाने भारतातही विशेषत: महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. गत दीड महिन्यांपासून संचारबंदी आणि ‘लॉकडाऊन’ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या काळात सांस्कृतिक चळवळ थंडावली की वृद्धींगत झाली, लेखक आणि कवींचे लिखान थांबले की पुरेशी सवड मिळाल्याने लिखानाला गती मिळाली, आदींबाबत ज्येष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांच्याशी साधलेला हा संवाद...

सध्या उद्भवलेल्या स्थितीबाबत आपण काय सांगाल?आपला भारत देश किंवा महाराष्ट्रच नव्हे; तर जगातील २०० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. हा विषाणू मानवनिर्मित की निसर्गनिर्मित हा वाद सद्या जोरात सुरू आहे; पण वास्तव स्थिती ही, की तो महामारीच्या स्वरूपात आपल्यासमोर उभा ठाकला आहे आणि त्याला समर्थपणे तोंड देणे हाच एकमेव उपाय आहे. प्रत्येकाने शक्यतोवर घरात राहणे, ही त्यावरची मजबूत अशी तोड आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवावे. त्यातच इतरांचीही सुरक्षा सामावलेली आहे.

‘लॉकडाऊन’मुळे सांस्कृतिक चळवळ थांबली का ?खरे म्हणजे प्रत्येकाने काळाबरोबर चालणे, हा प्रकृतीधर्म आहे. त्यामुळे  कुठलीच गोष्ट काळामागे पडत नाही. ती चालत राहते. कारण थांबला तो संपला. सांस्कृतिक चळवळ देखील अशीच आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सभा-संमेलने, मेळावे, परिसंवाद अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असेल, तरी संस्कृतिक जवळ थांबलेली नाही. फक्त तिचे माध्यम बदलले आहे. फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर काही सांस्कृतिक, साहित्यिक गट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. यामाध्यमातून कवींना, साहित्यिकांना निमंत्रित करून कविसंमेलन, चर्चा, अनुभवकथन यासारखे प्रयोग सातत्याने करत आहेत. त्यामुळे चळवळ थांबली, असे म्हणता येणार नाही.

लेखन प्रक्रियेविषयी काही...लेखन ही दोन अवस्थेतील प्रक्रिया असते. एखाद्या विषयामुळे मनातल्या मनात ती सुरू होते. तिच्या संदर्भातील जे काही विचार असतील ते परिपक्व झाले की त्या कलाकृतीचे प्रकटीकरण सुरू होते. मग ते पेनाच्या माध्यमातून कागदावर उतरविणे असो किंवा अलीकडे डिजिटल माध्यमातून स्क्रीनवर उमटणे असो; मात्र त्यासाठी माणसाला निवांतपणा हवा असतो. आज परिस्थिती अशी आहे  की प्रत्येक लेखक, कवी, कलावंत हा सक्तीने घरातच बंदिस्त आहे. त्यामुळे त्यास फार मोठी संधी चालून आलेली आहे. बंदीच्या काळात लेखकांची सृजनशीलता वाढीस लागत आहे. त्यातूनच अनेक कलाकृती जन्मास येत आहेत. मी सद्या एक कादंबरी, एक प्रवासवर्णन आणि माझे आत्मचरित्रात्मक लेख असे तिहेरी लेखन चालू ठेवले  आहे. सारांशाने लेखन प्रक्रिया ही कधीच थांबत नसते. सद्या तर त्यासाठी पुरक आणि पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत