शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनचा फटका :  सराफा व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:46 IST

पश्चिम वऱ्हाडातील सुवर्ण व्यवसायाचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.

- अमोल कल्याणकरमालेगाव (वाशिम) : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संचारबंदी व लॉकडाउन असल्याने याचा फटका उद्योग, व्यवसायालाही बसत आहे. २३ मार्चपासून सराफा व्यवसाय बंद असल्यामुळे गुढीपाढव्यानंतर आता अक्षयतृतीयेवरही कोरोनाचे सावट निर्माण होण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांमधून वर्तविली जात आहे. पश्चिम वºहाडातील सुवर्ण व्यवसायाचा विचार केल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३ मे पर्यंत संचारबंदी लागू आहे. २३ मार्चपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद आहेत. यामध्ये सराफा व्यवसायाचादेखील समावेश आहे. या बंद काळात लग्नतिथी, गुढीपाडवा मुहूर्तावर सराफा दुकाने बंद असल्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी  एक असलेली अक्षय तृतिया २६ एप्रिल रोजी आहे. अक्षयतृतीयेलादेखील सराफा व्यवसायात मोठी उलाढाल होत असते. या मुहुर्तावर अनेक लोक सोने खरेदी करतात. परंतु, कोरोनामुळे अक्षयतृतीयेलादेखील सराफा दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यावसायिकांमधून वर्तविली जात आहे. सराफा व्यावसायिक हे अ वर्गात येतात तर कारागीर हे घटक ब वर्गात येतात. वाशिम जिल्ह्यातील एका हजारांहून अधिक, बुलडाणा जिल्ह्यात २२०० पेक्षा अधिक तर अकोला जिल्ह्यात अडीच हजाराच्या आसपास कारागिरांची संख्या आहे. कारागिरांची आर्थिक परिस्थिती ही सर्वसाधारण असल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. त्यात अनेक कारागिर हे परजिल्ह्यातील आहे. संचारबंदीपूर्वी काही कारागिर स्वजिल्ह्यात परतले तर काही कारागिर लॉकडाउननंतर निघून जाण्याची शक्यताही सराफा व्यावसायिकांनी वर्तविली.

 दरवर्षी लग्नसराई तसेच सण, उत्सवाच्या पृष्ठभूमीवर अकोला, वाशिम, बुलडाणा या तीन जिल्ह्यात दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संचारबंदी व लॉकडाउन असल्याने सराफा प्रतिष्ठाने बंद आहेत. छोटे कारागीर आणि छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सराफा दुकाने किमान एका दिवसापुरती तरी सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. - ज्ञानेश्वर वाढणकरसराफा व्यावसायिक, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय