शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 08:44 IST

वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस  (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली.

ठळक मुद्देपर्यावरणासंदर्भातले स्थानिक मुद्दे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधीगैर-सरकारी संस्था गटात समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस  (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवार, १३ डिसेंबर रोजी दिली. हा बहुमान मिळविणारी युवी सोसायटी ७ राज्यात असलेली सोळावी संस्था ठरली आहे.पर्यावरणाशी संलग्नित जागतिक स्तरावरील निर्णय घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र पर्यावरण विभाग १९३  देशांच्या सहकर्याने कार्यरत आहे. पर्यावरण विधानसभेत ११८ स्थायी प्रतिनिधींची समिती, विविध राष्ट्रांचे १९३ पर्यावरण मंत्री, यासह नऊ प्रमुख गट आणि भागधारक आहेत. भागधारकांमध्ये शेतकरी, महिला, वैज्ञानिक आणि तांत्रिक समुदाय, मुले आणि युवा, स्थानिक लोक आणि त्यांचे समुदाय, कामगार आणि कामगार संघटना, व्यवसाय आणि उद्योग, गैर-सरकारी संस्था, स्थानिक अधिकारी यांचा समावेश असतो. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यामध्ये प्रमुख गट आणि हितधारकांचा सहभाग महत्वपूर्ण मनाला जातो. यात पर्यावरण संदर्भात उल्लेखनीय कार्य करणाºया गैर-सरकारी संस्था गटात वाशिमच्या युवी सोसायटीस मान्यता मिळाली आहे. भविष्यात सर्व सार्वजनिक बैठका, संयुक्त राष्ट्रे पर्यावरण सभा, स्थायी प्रतिनिधींची समिती व सत्रांकरिता युवी सोसायटी निरीक्षक म्हणून आमंत्रणे प्राप्त करेल. पर्यावरण संसदेच्या सत्रादरम्यान, पर्यवेक्षक म्हणून पूर्ण चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी आणि सरकारी प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी, यूएन पर्यावरण सचिवालयद्वारे माहिती दस्तऐवज स्वरूपात सरकारला लिखित वक्तव्य प्रक्षेपित करण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण सभेच्या चर्चेदरम्यान तोंडी वक्तव्य करण्यासाठी संस्थेस कायमस्वरूपी मान्यता राहणार आहे. वाशिमच्या स्थानिकांचा वाटा आता पर्यावरणाशी संलग्नित जागतिक निर्णय प्रणालीत होणार असल्याचा अभिमान वाटतो, असे युवी सोसायटीचे अध्यक्ष नारायण सोळंके यांनी सांगितले.२००५ पासून कार्यरत असलेल्या नागठाणा स्थित युवी सोसायटीने शिक्षण, ग्रामविकास व पर्यावरणात आपले भरीव योगदान दिले आहे. संस्थेअंतर्गत राबविलेल्या ‘कॅप फॉर स्कूल’, माय कंट्री, कोप इन माय सिटी इत्यादी प्रकल्पांचा आधीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गवगवा झाला आहे. फ्रांसच्या ‘क्लायमेट इंटरअक्टीव्ह’ संस्थेशी करार करून संस्था गेली दोन वर्षे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहयोगाने जागतिक तापमान संलग्नित ‘सिम्युलेशन’ व ‘कॉन्फरन्स आॅफ पार्टीज’चे प्रतिरूप सादर करून नवयुवकांना हवामान बदलाशी अवगत करीत आहे. 

टॅग्स :United StatesअमेरिकाwashimवाशिमNatureनिसर्ग