शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:34 IST

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कारंजातील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, ना. संजय कुटे, प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार नीलक नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार राजगुरू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली. शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत पीककर्ज माफी सुरूच राहणार असून, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात ठिंबक सिंचन देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिचंनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले. त्यातुन हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधुन गावांना शहरांशी जोडले. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत शासनाने राबविलेल्या विविध आरोग्यविषयक योजनेचा जनतेला चांगलाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी अडाण यासह जिल्हयात अन्य बॅरेजेसची मागणी केली. सभेला ३० हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. ईव्हीएमवर आरोप न करता जनतेच्या मनाचा कौल घ्यावा !विरोधी पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही बाब चुकीची असून, ईव्हीएमवर आरोप न करता विरोधकांची जनतेच्या मनाचा कौल घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आम्ही ईव्हीएममूळे नव्हे; तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्यानेच बहुमताने कौल मिळाला, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३७० कलमाबाबत भाष्य टाळलेकेंद्र सरकारने कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयावर कारंजा येथील जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपा-सेना युतीचे दिले संकेतपाच वर्षात भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेसमोर मांडून भाषणाच्या अखेरीस आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपा-सेनेचीच सत्ता येणार असे सांगत भाजपा-सेना युतीचे संकेत दिले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राwashimवाशिमKaranjaकारंजाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस