शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

भागवत कथा श्रवणाने काम, क्रोध, अहंकार नष्ट होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

वाशिम : स्थानिक ओंकारेश्वर धाममध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सोमवारी प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचे प्रबोधन ...

वाशिम : स्थानिक ओंकारेश्वर धाममध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सोमवारी प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य विजयप्रकाश दायमा यांनी भागवत कथा श्रवण केल्याने काम क्रोध अहंकार नष्ट होते, असे प्रतिपादन केले.

श्री चरखा परिवार व गायत्री सत्संग मंडळाच्यावतीने श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे आचार्य विजय प्रकाश दायमा यांच्या वाणीतून स्थानिक ओंकारेश्वर धाम चरखा यांच्या निवास्थानी गुरुद्वारा रोड येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यात भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य दायमा म्हणाले की, मनुष्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे. जीवनात पाणी व वाणीचा सदुपयोग करावा, असे सांगतानाच भागवत कथा श्रवण केल्याने काम क्रोध अहंकार नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक श्री ओंकारेश्वर धाम येथे आयोजित श्रीमद भागवत सप्ताहाचे मुख्य यजमान ज्योती चरखा, पप्पूभाऊ चरखा असून त्यांनी सर्वप्रथम आचार्य दायमा यांचे पूजन केले. यावेळी पुढे दायमा म्हणाले की, आज ठिकठिकाणी भागवत सप्ताह आयोजित केल्या जात आहे. मात्र मनुष्याला मानसिक शांती मिळत नाही. याचे कारण मनुष्य हा भागवत कथा ऐकतो मात्र त्याचे चिंतन मनन अनुसरण करत नाही. आईवडिलांची सेवा केल्याने ईश्वराची प्राप्ती होते. मनुष्य प्राप्तीसाठी संयम, सदाचार, सेवा व स्नेह हे चार गुण अंगी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

------

दरदिवशी १२ ते ५ दरम्यान कथा वाचन

श्रीमत भागवत कथा दररोज दुपारी बारा ते पाच वाजताच्या दरम्यान होत आहे. शासकीय नियमाचे पालन करीत भागवत कथा यू ट्यूब व फेसबुकवर लाईव्ह दाखविण्यात येत आहे. भाविक भक्तांनी कोरोना नियमाचे पालन करून कथा श्रवण करण्याचे आवाहन चरखा परिवार व आनंद दायमा, सत्यनारायण अग्रवाल, कचरूलाल भांगडिया, नीलेश सोमानी आदींनी केले आहे.