शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

दुकान फोडून लाखो रुपयांची विदेशी दारू लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 11:02 IST

वाईन बारची शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी (तळीरामांनी) लाखो रूपयांची विदेशी दारू लंपास केल्याची घटना ५ एप्रिल रोजी उघडकीस आली.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश ‘लॉक डाऊन’ आहे. संचारबंदी असल्याने शहरातील मद्यविक्रिची दुकाने, बियरबार व हॉटेल्स बंद आहेत. तळीरामांना दारू भेटत नसल्यामुळे दारूचा साठा असलेली दुकाने फोडण्याचा प्रताप नुकताच चिखली (जि.बुलडाणा) येथे घडला होता. नेमकी या घटनेची पुनरावृत्ती वाशिम शहरात घडली. शहरातील हिंगोली नाका परिसरात असलेल्या सम्राट वाईन बारची शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी (तळीरामांनी) लाखो रूपयांची विदेशी दारू लंपास केल्याची घटना ५ एप्रिल रोजी उघडकीस आली.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर जमावबंदीपासुन दारूची दुकाने, बार रेस्टॉरंट बंद आहेत. यामुळे तळीरामांना दारू मिळेनाशी झाली आहे. तळीरामांनी दारूचा साठा असलेली ठिकाणे शोधुन त्याठिकाणी चोरी करण्याचे धाडस करीत असल्याचे समोर येत आहे.लॉकडाऊन जाहिर झाल्यापासुन सम्राट वाईन बार हे प्रतिष्ठण बंद आहे. या भागात तुरळक दुकाने असल्याने नेहमीच शुकशुकाट असतो. नेमका या शुकशुकाटीचा फायदा घेत तळीरामांनी शटर वाकवून बारमध्ये प्रवेश केल्यानंतर विविध कंपनीच्या मद्याच्या बाटल्या लंपास केल्या. विशेष म्हणजे बार मधील सीसी कॅमेऱ्याचा डीव्हीआरही तळीरामांनी लंपास केला. या तळीरामांनी केलेल्या चोरीत नेमका किती लाखांचा मद्यसाठा लंपास झाला आहे याची निश्चित आकडेवारी समोर आली नसली तरी हा साठा चार ते पाच लाखांच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी