शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
3
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
4
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
8
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
9
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
10
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
11
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
12
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
13
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
14
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
15
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
16
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
17
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
18
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
19
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
20
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती

बँकेतील ‘विड्रॉल’वर मर्यादा; ग्राहक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:04 IST

मानोरा येथील प्रकार : मर्यादा हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : नोटाबंदीनंतर आता पुन्हा मानोरा तालुक्यात रोकडचा तुटवडा जाणवत आहे. बँकेतून केवळ दहा हजार रुपयांचाच विड्रॉल दिला जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत.केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या. या घटनेला नऊ महिन्याचा कालावधी उलटला; तरीसुध्दा मानोरा येथील स्टेट बँकेने केवळ दहाच हजार रुपयांचा विड्राल मर्यादा लादली आहे. त्यामुळे नागिरकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्टेट बँकेने दहा हजार रुपयांची विड्राल मर्यादा कायमच ठेवल्याने अनेकांना पैशासाठी त्रास होत आहे. सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी खत, बियाणे, तणनाशक फवारणी यासोबतच दर सप्ताहाला मजुरीसाठी पैसे काढावे लागतात; परंतु बँकेने दहा हजार रुपयांची ‘विड्राल’ मर्यादा लादल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.भारतीय स्टेट बँक वगळता इतर बँकामध्ये विड्रालची मर्यादा नाही, तर स्टेट बँकमध्येच का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ५० हजार रुपयांच्या विड्रालसाठी पाच वेळा बँकेत चकरा माराव्या लागतात. आम्हाला मंगरुळपीरवरुन जेवढा पैसा उपलब्ध होतो; तेवढाच पैसा दिवसभर नागरिकांना पुरवावा लागतो. पैसा कमी येत असल्यामुळे दहा हजार रुपयांची विड्राल मर्यादा ठेवण्यात आली आहे. पुरेसा पैसा उपलब्ध झाल्यास विड्रालची मर्यादा वाढवली जाईल. - टी.एन. धार्मिक, शाखाधिकारी मानोराइतर बँकांप्रमाणे स्टेट बँके नेसुद्धा विड्राल मर्यादा वाढवायला हवी होती. या संदर्भात बँकेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावर तोडगा निघाला नाही, तर शिवसेना स्टाइलने आंदोलन उभारु.- रवी पवार, तालुकाप्रमुख, शिवसेना