शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील चारही ठिकाणचे वीज अवरोधक यंत्र निकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:06 IST

वाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. मात्र, आजमितीस चारही ठिकाणचे हे यंत्र निकामी ठरले असून जिवीतहानीचा धोका यामुळे बळावला आहे. गेल्या दोन वर्षात वीज अंगावर पडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. याशिवाय मुक्तपणे वावरणाºया जनावरांनाही जीव गमवावा लागला. दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यात वातावरणात अचानक बदल होवून वादळवारा, अवकाळी पाऊस होत असल्याचा अनुभव गत काही वर्षांमध्ये जिल्हावासी अनुभवत आहेत. याचदरम्यान प्रामुख्याने ढगांचा गडगडाट होऊन आकाशातून जमिनीकडे आकर्षित होवून विजा पडण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. यावर काहीअंशी प्रतिबंध असावा, या हेतूने जिल्ह्यात वाशिम शहरातील जुने नगर परिषद कार्यालय, वारा जहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा लाड) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी वीज अवरोधक यंत्र स्थापित करण्यात आले होते. मात्र, मुदतबाह्य झालेले चारही ठिकाणचे हे यंत्र आजरोजी पूर्णत: निकामी ठरले आहे. असे असताना पर्यायी व्यवस्था करण्याकडेही प्रशासनाने लक्ष पुरविले नाही. यामुळे विज पडून जिवीतहानी होण्याची शक्यता बळावली आहे. 

आकाशातील विजांमुळे दोन वर्षात झालेली हानी!२९ मे २०१७ - वीज अंगावर पडून मोरगव्हाणवाडी (ता.रिसोड) येथील दोन मजुरांचा मृत्यू ३१ मे २०१७ - कुरळा (ता. मालेगाव) येथील वृद्धाचा मृत्यू. ३ जून २०१७ - कळंबा बोडखे (ता. मंगरूळपीर) येथील महिला गंभीर जखमी. ११ आॅक्टोबर २०१७ - साळंबी (ता.मंगरूळपीर) येथे १६ जनावरे मृत्यूमुखी.११ एप्रिल २०१८ - विळेगाव (ता.मानोरा), वारा जहाँ (ता.वाशिम) येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू.

टॅग्स :washimवाशिम