शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने केली काळविटाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 15:46 IST

त बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/पांगरी नवघरे : येथून जवळच असलेल्या शेलगाव बोदाडे येथील पंढरी काळे या शेतकºयाच्या शेतात बिबट्याने काळविटाची शिकार केल्याची घटना २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान उघडकीस आली.  दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा व पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू केली.शेलगाव बोंदाडे येथे २९ जून रोजी सकाळी ६.३० वाजता पंढरी काळे व उद्धव वाझुळकर यांना बिबट्या दिसून आला. त्याच शेतात एक काळवीट मृतावस्थेत आढळून आले. या काळविटाची शिकार बिबट्यानेच केली असावी, असा दाट संशय शेतकºयांसह गावकºयांनी व्यक्त केला. सकाळच्या सुमारास बिबट्याकडून काळविटाची शिकार होत असल्याचे दृश्य पाहिले, असे पंढरी काळे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे कर्मचारी झुंझारे व इतरांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा शोध सुरू केला. घटनास्थळावर पायाचे ठसे उमटले असून वन कर्मचाºयांनी त्याचे छायाचित्रही घेतले. शेलगाव बोंदाडे परिसरात बिबट्या आढळून आल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.   शेलगाव बोंदाडे येथे एका प्राण्याने काळविटाची शिकार केल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे कर्मचारी पाठविण्यात आले आहेत.  काळविटाची शिकार करणारा प्राणी हा वाघ किंवा बिबट नसून तडस असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.    - सिध्दार्थ वाघमारे,वन परीक्षेत्र अधिकारी, मेडशी-- काळविटाची शिकार झाल्यानंतर तेथे पाहणी केली असता, आढळून आलेले पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे दिसून येते.-शिवाजी बळी, वन्यजीव प्रेमी मालेगाव--सोमवारी सकाळच्या सुमारास  काळविटाची शिकार करताना मी बिबट्याला पाहिले आहे. परिसरात बिबट्या आढळून आल्याने भीतीचे वातावरण आहे.     -पंढरी काळे,शेतकरी, शेलगाव बोंदाडे

टॅग्स :washimवाशिमleopardबिबट्या