शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेतून-----

By admin | Updated: December 12, 2014 00:09 IST

पॅकेजचा पाऊस

पॅकेजचा पाऊस
विरोधाचा दुष्काळ
विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज, वैध सावकारांचे शेतकऱ्यांवर असलेले कर्ज, विजेचे तिमाही बिल माफ आदी घोषणांचा पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पाडला. मात्र, विरोधी बाकावरून कुणीही या पॅकेजविरोधात चकार शब्दही काढला नाही. घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणल्याची पावती दिली तर दुसरीकडे विरोधी बाकांवर मात्र सारे सुन्न होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात एकमेकांकडे पाहत होते. विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्यामुळे कुणी विरोधाची सुरुवात करावी, कदाचित असा प्रश्न विरोधकांना पडला असावा. एकूणच सभागृहात विरोधकांकडून विरोधाचा दुष्काळ पहायला मिळाला. दूध उत्पादकांचा प्रश्न, वाळू धोरण, मंत्र्यांची अनुपस्थिती आदी मुद्यांवर दुपारपर्यंत आक्रमक असलेले विरोधक पॅकेजच्या घोषणेनंतर एवढे शांत कसे, सरकारच्या पॅकेजवर विरोधक समाधानी आहेत की काय, असे एक ना अनेक प्रश्न विरोधकांची स्तब्धता पाहून निर्माण झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी चर्चेला उत्तर देताना केलेली सुरुवात अतिशय भावुक होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचे सांगत ही वेळ का येते यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज व्यक्त केली. एवढेच नव्हे तर निराशेच्या गर्तेत बुडालेल्या शेतकऱ्याला अख्खी विधानसभा पाठीशी असल्याचा विश्वासही द्यायला ते विसरले नाहीत. दूध उत्पादकांच्या प्रश्नावर दूध उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण केला. सभागृहाचे कामकाज रोखून धरले. शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करीत प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन द्यावे लागले. सत्ताधारी सदस्यांना आज पुन्हा छगन भुजबळ यांनी सभागृहात वावरण्याच्या संकेतांवरून कानपिचक्या दिल्या. सभागृहात कसे यावे, कसे बाहेर जावे, कसे बसावे याचे मार्गदर्शन त्यांनी सदस्यांना करीत अप्रत्यक्षपणे आपण सत्तेत असला तरी नवखे आहात हेच दाखवून दिले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षातर्फे दलित अत्याचारावर उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत विरोधी सदस्यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडले तर सत्ताधाऱ्यांनी राज्यकारभाराला दीड महिनाच झाल्याचे सांगत ही परिस्थिती बदलू, असा विश्वास व्यक्त केला.
- कमलेश वानखेडे