शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोनल प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी सोडा ; शेलुबाजारच्या व्यापाऱ्यांनी पुकारला बंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:30 IST

शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाऱ्यांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.

ठळक मुद्देसोनल संघर्ष समितीने केलेल्या चर्चेच्या वेळी समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ३१ मार्चपर्यंत यासंदर्भात कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही. यासाठी शेलूबाजार येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून १ एप्रिल रोजी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन संघर्ष समितीला जाहीर पाठींबा दिला आहे.

शेलूबाजार (वाशिम) : सोनल सिंचन प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवून ते २० गावातील नागरिकांना विनाविलंब उपलब्ध करावे. तसेच या प्रकल्पातील पाणी इतरत्र वळवू नये, या मागणीसाठी येथील व्यापाºयांनी १ एप्रिल रोजी व्यापारपेठ बंद पुकारला असून आपापली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात सोनल संघर्ष समितीने घेतलेल्या भुमिकेचेही व्यापाऱ्यांनी समर्थन केले आहे.सोनल पाणलोट क्षेत्र परिसरातील २० गावाच्या लोकांनी सोनल प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी त्वरीत सोडण्यात यावे तसेच सोनलचे पाणी इतरत्र वळवू नये या मागणीसाठी २७ मार्च रोजी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांसोबत सोनल संघर्ष समितीने केलेल्या चर्चेच्या वेळी समितीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ३१ मार्चपर्यंत यासंदर्भात कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही. दुसरीकडे सोनल प्रकल्प परिसरात वास्तव्य करणाऱ्या सुमारे २० गावांमधील लोकांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेवून संबंधित गावकऱ्यांना पिण्याचे पाणी तत्काळ उपलब्ध करावे, यासाठी शेलूबाजार येथील व्यापाऱ्यांनी एकत्र येवून १ एप्रिल रोजी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन संघर्ष समितीला जाहीर पाठींबा दिला आहे. ३१ मार्च रोजी बालाजी मंदिरात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृषी सेवा केंद्र संघटना, किराणा दुकानदार संघटना, सराफा असोसिएशन, हार्डवेअर असोसिएशन, हॉटेल्स संचालक व सर्व व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमDamधरण