शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 16:23 IST

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सोमवार, १ आॅक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सर्वसामान्य नागरिकासोबतच नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याबाबतची आस्था वाढविण्याच्या दृष्टिकोनातून वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सोमवार, १ आॅक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला.यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपविभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उत्तम फड, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, वन परिक्षेत्र अधिकारी संजय नांदुरकर, आकाश आहाळे आदी उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहनिमित्ताने वन विभागाच्या वतीने विविध स्तरावर निबंध, चित्रकला व छायाचित्र स्पधेर्चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी वायाळ यांनी प्रस्ताविकात दिली.यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, प्रत्येक वन्यजीव हा निसर्ग व पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वन्यजीव रक्षणासाठी शासनाने विविध कायदे केले आहेत. या कायद्यांचे पालन करणे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, वन्यजीव व वृक्षांच्या तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येवून प्रयत्न करावेत. यावेळी उपस्थित असलेल्या विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी मिश्रा यांनी संवाद साधला. राठोड, श्री. चंदनशिव यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संचालन नांदुरकर यांनी केले, तर आभार फड यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीव