शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 18:10 IST

सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत दुसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे येथे नालाखोलीकरण व समतल चर खोदकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते १०  डिसेंबर रोजी करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत दुसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे येथे नालाखोलीकरण व समतल चर खोदकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते १०  डिसेंबर रोजी करण्यात आला. यावेळी सरपंच बाबाराव गुंजाटे, विनायक गुंजाटे, किशोर काठोडे, मुलीधर भोयर, रमेश गुजाटे, विठ्ठल दोरीक, विशाल गुजाटे, राजीव भेंडे, गुड्डू कानकीरड, बिजीएसचे अक्षय शेरसुरकर, प्रफुल बाणगावकर, राजेश हवा यांची उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी यांनी समतल चर खोदकामाची पाहणी करून नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ  केला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. जलसंधारणाच्या या कामांना नागरिकांचा उ्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे अभियंता सैय्यद शेख यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी ग्राम वाहितखेड येथे कृषी विभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रावर समतल चर खोदकामाचा शुभारंभ तालुका कुषी अधिकारी संतोष वाळके व कृषी पर्यवेक्षक आर. एस. घुले, ग्रामसेविका एस. डी. काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कारंजा तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी तसेच पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत तर शासनाच्यावतीने डिझेल पुरविले जात आहे. जलसंधारणाच्या कामांना ‘लोकचळवळी’चे स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा