शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:30 IST

राज्यशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलैपासून जिल्ह्यातही वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १४.४४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवित वृक्षारोपण केले.पहिल्या दिवशी जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख वृक्ष लागवड झाल्याचा दावा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :सामाजिक वनिकरण, वनविभाग, प्रशासकीय कार्यालये, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांनी १ जुलै रोजी जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिम राबविली. राज्यशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ जुलैपासून जिल्ह्यातही वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ झाला. वाशिम जिल्ह्यात १ ते ३१ जुलै या कालावधीत १४.४४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतीसह वनविभाग व सामाजिक वनिकरणला शासनाकडून वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. १ जुलैपर्यंत उद्दिष्टाएवढे खड्डे संबंधित त्या-त्या विभागांनी खोदून ठेवले होते. गत तीन, चार दिवसांत पाऊस पडल्याने अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. पहिल्या दिवशी जिल्हाभरात जवळपास सव्वा लाख वृक्ष लागवड झाल्याचा दावा करण्यात आला.  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय परिसर, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी शाळा, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये यासह स्वयंसेवी संस्थांनी वृक्षारोपण मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला. राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदवित वृक्षारोपण केले.

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग