शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 14:00 IST

वाशिम  : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत ही पडताळणी पूर्ण करावयाची असून, सध्या सर्व कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत.मराठी माध्यमातील ३३ मुख्याध्यापक, २६२ पदवीधर शिक्षक, १०३६ सहायक शिक्षकांचा या बदलीमध्ये समावेश आहे.ऊर्दू माध्यमातील एक मुख्याध्यापक, १७ पदवीधर शिक्षक व ५३ सहायक शिक्षकांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. ३१ जुलैपर्यंत ही पडताळणी पूर्ण करावयाची असून, सध्या सर्व कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत.मे महिन्यात जिल्ह्यांतर्गत १४०२ तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेंतर्गत ५८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. मराठी माध्यमाच्या एकूण १३३१ जणांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या असून, ऊर्दू माध्यमाच्या ७१ बदल्या झाल्या. मराठी माध्यमातील ३३ मुख्याध्यापक, २६२ पदवीधर शिक्षक, १०३६ सहायक शिक्षकांचा या बदलीमध्ये समावेश आहे तर ऊर्दू माध्यमातील एक मुख्याध्यापक, १७ पदवीधर शिक्षक व ५३ सहायक शिक्षकांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील एकूण २५४, मालेगाव तालुक्यातील एकूण २५१, मानोरा तालुक्यातील एकूण १९५, मंगरूळपीर तालुक्यातील एकूण २०२, रिसोड तालुक्यातील एकूण १९० आणि वाशिम तालुक्यातील सर्वाधिक ३१०  अशा एकूण १४०२ शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाईन पद्धतीने बदल्या झाल्या. यामध्ये एक ते चार संवर्गातील काही शिक्षकांनी बदलीसाठी विशिष्ट संवर्गाचे पुरावे सादर करून सवलतीचा लाभ घेतला. बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या एक ते चार संवर्गातील शिक्षकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची १०० टक्के पडताळणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी त्रिस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी केली जात असून, काही शिक्षकांनीदेखील गटशिक्षणाधिकाºयांमार्फत शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केल्या आहेत. विशेषत: अपंग प्रमाणपत्रावर अनेकांचा संशय असून, त्या दृष्टिकोनातून या पथकातील आरोग्य अधिकाºयांमार्फत अपंग प्रमाणपत्राची तपासणी होणार आहे. त्यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले असून, कारवाई टाळण्यासाठी ‘गॉड फादर’मार्फत फिल्डिंग लावली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास कारवाईची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक