शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अवघ्या अर्धा तासात झाली दोन लाख रुपये लोकवर्गणी

By admin | Updated: May 16, 2017 20:05 IST

कारंजा लाड : पाणी फाउंडेशनच्यावतीने श्रमदानावर आधारीत असणारी "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" लोकसहभागातून राबविण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड :  पाणी फाउंडेशनच्यावतीने श्रमदानावर आधारीत असणारी "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. स्पर्धेत कारंजा तालुक्यातील जयपुर गावाने हिरहिरीने सहभाग घेतला असून ८ एप्रिल ते १५ मे पर्यंत ३७ दिवसाच्या काळात गावाने सकाळ संध्याकाळ श्रमदान करून दुप्काळाशी दोन हात करत आतापर्यंत चार हजार घन मिटरचे काम श्रमदानातून पुर्ण केले. मात्र गाव शिवारातील जलसंधारणाची कठीन कामे मशिनव्दारे होण्यसाठी डिझेलची आवश्यता असल्याचे आवाहन सत्यमेव जयते वॉटर कप स्पधेर्तील वॉटर हिरोजने १५ एप्रिल रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजीत सभेत गावकऱ्यांना केले. यावेळी गावकऱ्यांनी अर्धा तासात दोन लाख रुपये लोकवर्गनी जमा केली. ज्या पध्दतीने गावातील महीला व पुरूप युवा वर्ग आबालवृध्दा लहान मुले श्रमदानासाठी एकवटले त्याच पध्दतीने जयपुर गाव आता लोकवर्गनी साठी सुध्दा गावकरी एकवटले असल्याचे दिसून येत आहे. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या ह्यसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेला २२ मे रोजी थांबणार आहे. ही स्पर्धा राज्यातील तीस तालुक्यात राबविली जात असून जलसंधारणाच्या विकासासाठी जी जलचळवळ महाराप्टभर पसरली आहे, त्यातले कित्येक जलक्रांतीकारक हे स्वत:ला विसरूण सतत काहीतरी वेगळं काहीतरी नविन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि महत्वाचे म्हणजे महीला पुरूपांच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहे. किंवा त्यापेक्षा एक पाउत पुढे असं म्हणंण जास्त योग्य ठरेल. गावकऱ्यांनी गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून सि.सि.टी, एल.बी.एस, शेतीची बांध बधिस्ती, माती नाला बांध, व्हॉट आदी विविध जलसंधारणाची कामे जयपुर येथील गावकऱ्यांनी केली. श्रमदानासाठी रात्रण दिवस एक करून वॉटर कप जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. श्रमदानासाठी वॉटर कप स्पर्धेत २० मार्क देण्यात येते तर मशिनव्दारे होणाऱ्या कामाला स्पधर्ेत २० मार्क मिळणार आहे. जलसंधारणाची कामे मशिनव्दारे करण्यासाठी कारंजा - मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडून एक पोकलँड तर भारतीय जैन संघटनेकडून एक पोंकलँड जयपुर येथे देण्यात आला. या मशिनच्या डिझेल साठी लोकवर्गनी कुठून आणायची हा प्रश्न जयपुर गावापुढे होता. याकरीता १५ एप्रिल रोजी गावकऱ्यांची सभा घेण्यात आली. सभेत कारंजा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा जे.डी.चवरे विदयालयाचे माजी मुख्याध्यापक अविनाश मुथोळकर यांची उपस्थिती होती. यावेळी मुथोळकर यांनी जयपुर गावला टिकास व फावडे व टोपले आदी साहीत्य दिले. तसेच डिझेल साठी ५००० हजार रुपये दिले. यावेळी गावकरी सुध्दा लोकवर्गनी देण्यासाठी ऐकवटले गावकऱ्यानी अर्धा तासात दोन लाख रुपये जलसंधारणाच्या कामात लोकवर्गनी जमा केली. ज्या पध्दतीने गाव श्रमदानासाठी एकवटले त्याच पध्दतीने आता गाव लोकवर्गनीसाठी एकवटल एवढेच नाहीत तर गावातील संजय गांधी निराधार योजनेचा पगार घेणारे अंबादास रामटेके यांनी एक महीण्याचा पगार दिला. तसेच तेथील कार्यरत असणारे ग्रामसेवक नरेश गजभिये यांनी एक महीण्याचा पगार देवुन जयपुर येथील श्रमकऱ्यांचा उत्साह वाढविला. जलसंधारणाच्या कामासाठी गावातील ज्या ज्या व्यक्तीने लोकवर्गनी दिली. त्या वर्गनी दात्याची नावे गावातील चैकाचैकात लावण्यात येतील असे वॉटर हिरोजने जाहीर केले