शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

RTE मोफत प्रवेशासाठी आता अखेरची संधी; २२ मे पर्यंत मिळाली अंतिम मुदतवाढ

By दिनेश पठाडे | Updated: May 13, 2023 12:35 IST

सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व  प्रवेश निश्चितीकरिता २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी (दि.१२)सायंकाळी उशिरा काढले आहेत.

वाशिम : आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरिता अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून येत्या २२ मे पर्यंत प्रवेश घेण्याची अखेरची संधी असणार आहे. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार  सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या ऑनलाइन सोडतमध्ये निवड यादीतील बालकांचे  प्रवेश १३ एप्रिलपासून सुरु झाले. निवड समितीकडे जावून प्रवेश घेण्यासाठी सुरुवातीला २५ एप्रिल मुदत होती. त्यानंतर ८ मे आणि पुन्हा १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व  प्रवेश निश्चितीकरिता २२ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून त्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी (दि.१२)सायंकाळी उशिरा काढले आहेत. सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात शनिवार(दि.१३)  १२ वाजेपर्यंत निवड झालेल्या ७७५ पैकी ४८७ बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते. 

२२ मे नंतर प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेशआरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया २२ मे नंतर सुरु करण्यात येणार आहे.  निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया संपताच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे मेसेज पाठविले जाणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रतीक्षा यादीतील नंबरची खात्री करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा