शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या भूसंपादन मोबदल्यावर आक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:47 IST

एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात एनएच-१६१ या राष्टÑीय महामार्गासाठी मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमिन संपादित करण्यात आली. आता या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत असताना जमिनीच्या हक्कासह इतर काहीबाबतीत हरकती व आक्षेप दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाला या प्रकरणांच्या सुनावणीत न्यायनिवाडा करूनच शेतकºयांना मोबदला वितरीत करता येणार आहे. एकूण ३२ गावांपैकी १२ गावांतून ३५ हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या एनएच-१६१ क्रमांकांच्या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील शेतकºयांच्या २५१ हेक्टर जमिन संपादनाचे काम महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाने सुरुवातीला शेतकºयांच्या जमिनीबाबत हरकती, दावे मागितले, तसेच जमिनीशी संबंधित सर्वच व्यक्तींचे जबाबही नोंदवून घेतले. त्यामुळे भुसंपादन प्रक्रिया पार पडली आणि जमिनीच्या मुल्यांकनानुसार मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भुसंपादनाच्या मोबदल्यात शेतकºयांना ३४६ कोटीचे वितरण करावे लागणार असून,आजवर १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. तथापि, शेतकºयांना जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विविध गावांतून या प्रक्रियेबाबत हरकती आणि आक्षेप दाखल करण्यात आले आहेत.आधीच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसह इतर तांत्रिक कारणांमुळेही यात खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकºयात निराशेचे वातावरण होते. आता मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरळीत होत असताना आक्षेप आणि हरकती दाखल करण्यात आल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.आक्षेपाचे स्वरूप वेगवेगळेराष्ट्रीय महामार्ग एनएच-१६१ साठी करण्यात आलेल्या भुसंपादनानंतर मोबदला देण्याबाबत दाखल हरकती आणि आक्षेपांचे स्वरुप वेगवेगळे आहे. त्यात काही जमिनींचे प्रकरण न्याय प्रविष्ट असणे, ताबा आणि वहिवाटीत फरक असणे, गट व नकाशात फरक असणे आदिंसह काही प्रकरणांत घरगुती वाद असल्याने जमिनीचा मोबदला अदा करण्याबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. आता या सर्व प्रकरणांवर उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयात सुनावणी होऊन न्यायनिवाडा झाल्यानंतरच मोबदला अदा करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असून, यात न्याय निवाडा न झाल्यास प्रकरण न्यायालयातही दाखल करता येणार आहे.

मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील ३२ गावात एनएच-१६१ क्रमांकाच्या महामार्गासाठी शेतकºयांची जमीन संपादित करण्यात आली आहे. आता या जमिनीचा मोबदला अदा करण्याची प्रक्रिया सुरू असताना १२ गावातून विविध प्रकारचे आक्षेप आणि हरकती दाखल करून मोबदल्यावर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सुनावणीनंतरच मोबदला देण्याचा निर्णय होणार आहे.- प्रकाश राऊतउपविभागीय अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग